नवी दिल्ली | देशातील विविध महत्वाच्या आणि वादग्रस्त खटल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने बाबरी मशिद आणि गुजरात दंगलींसोबत संबंधित खटले बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
गुजरात दंगलीशी संबंधित खटले निष्फळ ठरत असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण आहे. तसेच गुजरात दंगली (2002 Gujarat Riots) संबंधी अनेक खटल्यांवर निर्णय प्रक्रिया झाली आहे.
1992 सालच्या डिसेंबर महिन्यातील 6 तारखेला अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्याच्याशी संबंधित अवमान याचिका देखील बंद करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.
2002 च्या गुजरात दंगल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) यांच्या जामीन अर्जावर देखील न्यायालय विचार करणार आहे.
बाबरी मशीद प्रकरणातील सुरु असलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) आणि पत्रकार तरुण तेजपाल (Tarun Tejpal) यांच्याविरोधाच अवमानाची कारवाई बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
वकील प्रशांत भूषण आणि पत्रकार तरुण तेजपाल यांनी त्याप्रकरणी माफी मागितली होती. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई बंद करण्यात येणार आहे.
या दोघांविरोधात खटला बंद करण्याची मागणी कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी केली होती. त्यांच्या मागणीला न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने मान्यता दिली.
महत्वाच्या बातम्या –
पोलीस इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ससून रुग्णालयात दाखल
जय शहा यांच्या तिरंगा नाकारण्यावर प्रकाश राज आक्रमक; ट्विट करत म्हणाले,
भाजप – मनसे युती होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य
“एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी आणि सनातन धर्माचे…” बाबा रामदेव यांचे मोठे वक्तव्य
पूर आणि भीषण महागाईमुळे पाकिस्तान आला ताळ्यावर; भारताकडे केल्या ‘या’ मागण्या