मुंबई | राज्यात सध्या राजकीय दंगल जोरदार रंगली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अनेक मुद्द्यांवरुन एकमेकांचा पायउतारा करताना दिसत आहेत.
राजकीय कलगितुरा रंगलेला असतानाच केंद्रीय तपास यंत्रणांचा सपाटाही सुरुच आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण आणखीनच तापलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ईडीनं राज्यात कारवाईचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवरच ही कारवाई होत असलेली पहायला मिळत आहे.
ईडीच्या होणाऱ्या कारवाईवर सत्ताधाऱ्यांकडून भाजपला जबाबदार धरलं जात आहे. भाजप सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचे आरोप केले जात आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाईवर शिवसेना खासदार संजय राऊत सातत्यानं टीका करत असतात. असातच त्यांनी पुन्हा एकदा यावरुन भाजपला निशाण्यावर घेरलं आहे.
महाराष्ट्रातल्या जनतेवर भाजपा पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे. थोडे जरी पैसे खर्च केले तरी भाजपा लगेच ईडीला कळवेल, असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.
पैसे महाराष्ट्रात जपून खर्च करा. तुम्ही भाजी जरी खरेदी केलीत तरी तुमच्यावर भाजपाचं लक्ष आहे. तुम्ही चिकन खरेदी करायला गेलात तरी तुम्ही किती किलो चिकन घेतलंत, काल किती घेतलं, आज किती घेतलं यावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे, ते लगेच ईडीला कळवतील त्यामुळे सगळ्यांनी सावध राहायला हवं, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला आहे.
आम्ही लवकरच ट्रकच्या ट्रक ईडी ऑफिसवर घेऊन जाणार आहोत. तसेच, लवकरच ईडीचा सर्वात मोठा घोटाळा याच ठिकाणी बसून बाहेर काढणार आहोत, असंही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“पोलिसांनी राज ठाकरे यांना बेड्या ठोकाव्यात”
अत्यंत धक्कादायक घटना; पत्नीच्या हट्टासाठी आईला नदीत फेकलं
“कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहिती”