कोणासोबत एक रात्र घालवशील? भूमी पेडणेकर म्हणते…

मुंबई | बॉलिवूड मधील अनेक कलाकार हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. या कलाकारांचा जीवन जगण्याबद्दलचा दृष्टिकोन हा सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळा असतो.

बदलत्या काळानुसार ते देखील स्वतःला खूप वेगानं बदलत असतात. आपल्या देशातील अनेक लोक हे कलाकारांना कॉपी करत असतात. यामुळे त्यांच्या जगण्याचा दृष्टिकोण हा इतरांसाठी देखील अतिशय महत्वाचा असतो.

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचाही जिवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण अगदी व्यापक आहे. भूमी नेहमीच प्रत्येक गोष्टीकडे वेगळया नजरेने पाहत असते. तिला आपलं आयुष्य बिनधास्तपणे जगायला आवडतं. परंतु त्याबरोबरच स्वतःला या मातीशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न भूमी करत असते.

एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा प्रत्यय आला होता. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत भूमीने बिनधास्तपणे संवाद साधला होता. यावेळी तिने आजकालच्या रिलेशनशीपबद्दल देखील आपलं मत व्यक्त केलं होतं.

तुला कोणासोबत एक रात्र वेळ घालवायला आवडेल की दीर्घ काळासाठी नातं टिकवायला आवडेल? असा सवाल यावेळी तिला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना भूमी म्हणाली की, कोणत्याही व्यक्तिशी जवळीक साधायची असल्यास मला दिर्घ काळ टिकणारं नातं तयार करायला आवडेल. मला फ्रेंड्स विथ बेनिफिट्स हा पर्याय योग्य वाटतो.

आपण प्रेमात स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. यामुळे मनापासून प्रेम करण्यावर माझा विश्वास आहे, असं उत्तर भूमीने यावेळी दिलं. भूमीचं हे उत्तर आजच्या युवकांना नक्कीच प्रेरित करणारं ठरेल.

महत्वाच्या बातम्या-

‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन

स्वत:च्याच लग्नात नवरीने केला भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘धूम मचाले’ म्हणत तरूण आपल्या गाडीसह थेट शिरला घरात, पाहा मजेशीर व्हिडीओ

काय सांगता! चक्क हवेत उडतोय पिझ्झा, विश्वास नसेल बसत तर पाहा व्हायरल व्हिडीओ

ड्रोनवर हल्ला करण्यासाठी पाण्याबाहेर आली मगर अन्…, पाहा व्हि़डीओ