नवी दिल्ली | ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ कायदा दुरूस्ती विधेयकाला लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर आता फक्त पंतप्रधान आणि त्यांच्या अगदी जवळच्या नातेवाईकांनाच ‘एसपीजी’ सुरक्षा मिळेल, असं केंद्रीय मंत्री अमित शहांनी स्पष्ट केलं आहे.
‘एसपीजी’ कायदा दुरुस्तीनंतर माजी पंतप्रधानांना ही सुरक्षा पदावरून पायउतार झाल्यावर पाच वर्षांनंतर मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही भविष्यात त्याला अपवाद नसतील, असं अमित शहांनी सांगितलं आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा काढली तेव्हा काँग्रेसला इतका राग आला नव्हता, जेवढा गांधी घराण्याची सुरक्षा काढल्यावर आला, असं शहांनी म्हटलं आहे.
गांधी घराण्याला दिलेली नवी झेड प्लस सुरक्षा ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांनाही पुरवली जात आहे. हे विधेयक गांधी घराण्याच्या रागातून किंवा त्या तिघांना डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेतलेला नाही, असंही अमित शहांनी सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या-
“गेल्या सरकारमधील काहीजण महापोर्टलमध्ये हस्तक्षेप करून आपापल्या परीक्षार्थींना उत्तीर्ण करत आहेत” – https://t.co/SXkbuDQ0Gh @Awhadspeaks @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आमदाराचे नातलग उपस्थित; सोशल मीडियावर फोटो व्हायरल – https://t.co/XRYHg62456 @OfficeofUT @SandeepDadarMNS @ShivSena @AUThackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019
“पवारांच्या अनुभवाचा मोरंबा दिल्लीश्वरांना चाखता आला नाही” – https://t.co/83cVHOSq8v @PawarSpeaks @AmitShah @ShivSena @rautsanjay61 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019