रोहित शर्माचं टेन्शन वाढलं! टीम इंडियाचा ‘हा’ मॅच विनर फिटनेसमुळे अडचणीत

मुंबई | येत्या रविवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल. या मालिकेसह कर्णधार रोहित शर्माचेही संघात पुनरागमन होत आहे.

दक्षिण अफ्रिकेकडून पराभव स्विकारल्यानंतर आता टीम इंडियाला एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजला धुळ चारण्याच्या तयारीत आहे. मात्र, मालिकेआधीच भारतीय संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.

टीम इंडियाचा घातक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिका आणि आता वेस्ट इंडिज मालिकेतून बाहेर पडला आहे. खराब फिटनेसमुळे हार्दिक बऱ्याच दिवसांपासून अडचणीत आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्येही हार्दिकच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यानंतर आताही तो फिट नसल्याची माहिती मिळाली आहे. न्यूझीलंड मालिका आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती.

हार्दिकला फॉर्मच्या बाबतीत अनेक अडचणी येत असतील, पण संघातील त्याची उपस्थिती ही मोठी ताकद मानली जाते. वेस्ट इंडिजविरूद्धचा हा मोठा दौरा पाहता ही फार वाईट बातमी आहे.

गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पांड्याला सतत टीकेला सामोरं जावं लागत आहे. पहिल्या IPL आणि नंतर वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी खूपच खराब होती, त्यामुळे आता त्याला टीम इंडियात लवकर एन्टी मिळणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जातोय.

हार्दिक पांड्याला फिट राहण्यासाठी आराम दिला गेलाय. त्यामुळे आगामी रणजी मालिकेत तो पुन्हा खेळणार दिसेल, असं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आमदार नितेश राणेंची अचानक तब्येत बिघडली, वकिलांची धावपळ सुरू

“तोंड सांभाळून बोललं पाहिजे”, चंद्रकांत पाटलांचं मलिकांना सणसणीत प्रत्युत्तर

हिन्दुस्थानी भाऊला मोठा झटका, कोर्टानं दिलेला निर्णय ऐकून रडू कोसळेल!

जेनेलियाने दिली गुड न्यूज! आता रितेश होणार ‘मिस्टर मम्मी’

धक्कादायक! केस वाढवल्यानं शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण