Top news खेळ

विराटच्या ‘त्या’ वक्तव्यावर गांगुली चांगलाच भडकला, घेणार होता मोठा निर्णय पण…

virat saurabh

मुंबई | मागील काही दिवसांपासून कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. आता हा वाद काहीसा शांत झालेला दिसत आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादावर दोन्ही खेळाडूंनी स्पष्टीकरण दिलं आहे. दोघांनी आरोप फेटाळून लावले आहेत. तर विराट कोहलीने एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर वाद आणखीनच पेटला.

विराटने पत्रकार परिषदेत गांगुलीचा दावा फेटाळून देखील लावला होता. अशातच आता बीसीसीआयच्या निवड समितीने तासभर आधी आपल्याला वनडे कर्णधारपदावरून हटवल्याचा निर्णय कळवला होता, असं विराट म्हणाला.

विराटचा दावा फेटाळल्यानंतर गांगुली चांगलाच भडकला होता, अशी माहिती समोर आली होती. इंडिया अहेडने याबाबत वृत्त दिलं आहे.

या सर्व प्रकारानंतर गांगुली विराटला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याच्या तयारीत होता, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

सौरव गांगुलीने विराटला नोटीस पाठवली असती तर अनेक धक्कादायक खुलासे झाले असते आणि हा वाद आणखीनच पेटला असता. त्यामुळे बीसीसीआयच्या सदस्यांनी गांगुलीला रोखलं.

दरम्यान, बीसीसीआयच्या सदस्यांनी समजवल्यानंतर गांगुलीचा राग शांत झाला. आता मात्र, कोहली सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त झाला आहे. त्यामुळे विराट-गांगुली वाद आणखी पेटणार की क्षमणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आता इन्स्टाग्राम यूझर्संना देणार पैसे, जाणून घ्या कशी कराल चांगली कमाई

 मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! दारु झाली स्वस्त, शिवाय ‘हा’ नावडता नियमही बदलला!

टाटा आणि मारुतीच्या CNG गाड्यांमध्ये काँटे की टक्कर, ‘ही’ देते जबरदस्त मायलेज

 बापरे बाप ‘डोक्याला’ ताप! Omicronची ‘ही’ लक्षणे महिनाभर दिसतात; वेळीच घ्या काळजी

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, आता…