मुंबई | भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat kohli) काल कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. काल विराटने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विराटवर टीका होत असल्याचं दिसतीये.
भारताच्या अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार कपील देव यांनी देखील विराटच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे खेळाडू मदन लाल विराट कोहलीच्या निर्णयावर नाराज दिसले, मात्र, कपिल देव यांनी विराटचं समर्थन केलं आहे. तर सुनिल गावसकर यांनी देखील विराटच्या निर्णयावर आश्चर्यचकित नसल्याचं म्हटलं आहे.
मी कोहलीच्या निर्णयाचे स्वागत करतो. टी- ट्वेंटीचे कर्णधारपद सोडल्यापासून तो खूप कठीण काळातून जात होता, असं कपील देव यांनी म्हटलं आहे.
अलीकडच्या काळात तो खूप तणावात आणि दबावाखाली असल्याचं दिसत होतं. अशा स्थितीत कर्णधारपद सोडून दडपणमुक्त खेळणं हाच पर्याय होता आणि त्याने तो पर्याय वापरला, असंही कपील देव म्हणाले आहेत.
कोहलीला अहंकार सोडावा लागेल, प्रत्येकजण ज्युनियर कर्णधारपदाखाली खेळला आहे. त्यानेही खेळावं, असा सल्ला कपील देव यांनी दिला आहे.
विराट कोहली हा परिपक्व माणूस आहे. मला खात्री आहे की हा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी त्याने खूप विचार केला असेल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, असंही होऊ शकतं की त्याला कर्णधारपदाचा आनंद घेता आला नाही. आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असं म्हणत त्यांनी विराटच्या निर्णयाला सपोर्ट केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“मला मानसिक त्रास दिला जातोय”; शिवसेना आमदार संतोष बांगर यांचं पत्र व्हायरल
तालिबान्यांचा यु-टर्न! लवकरच ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता
किरण माने प्रकरणाला वेगळं वळण! सहकलाकारांनी केलेल्या आरोपामुळं खळबळ
विराटनंतर कॅप्टन कोण???, लिटल मास्टरने घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव
अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद