फुटबाॅलच्या मैदानात दुर्दैवी घटना; खेळाडू गोलकिपरला धडकला अन्…; पाहा व्हिडीओ

मुंबई | कोणत्या मैदानी खेळात मोठ्या प्रमाणात शारिरिक फिटनेस गरजेची असते. अशातच फुटबाॅलच्या मैदानातून धक्कादायक घटना समोर आली आहे.

फुटबॉल सामना सुरू असताना भरमैदानात एका खेळाडूचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे आता फुटबाॅलजगतात हळहळ व्यक्त केली आहे.

अल्जेरियन फुटबॉलपटू सोफियान लुकर याला शनिवारी ओरानमधील दुसऱ्या विभागाच्या सामन्यात ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला आहे.

सामना सुरू असताना त्याचा गोलकीपरशी टक्कर झाली. त्यानंतर सोफियान लुकरला लगेचच ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला प्राथमिक उपचारासाठी हलवण्यात आलं होतं.

या घटनेनंतर तो पुन्हा मैदानात 10 मिनिटांनी आला. पुन्हा खेळण्यास सुरूवात केल्यानंतर तो अचानक जमिनीवर कोसळला.

ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर तो लगेचच जमिनीवर कोसळला. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

Mouloudia Saida आणि ASM Oran क्लब यांच्या दरम्यान खेळला जात होता. Mouloudia Saida कडून खेळणाऱ्या सोफियान लुकर मृत्यू झाला आहे.

दरम्यान, केवळ 28 वर्षाच्या सोफियान लुकरचा मृत्यू झाल्यामुळे आता क्रिडाविश्वास दु:ख व्यक्त केलं जात आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्वाच्या बातम्या- 

“वडिलांनी सांगितलंच होतं, आज काहीतरी वाईट होणार”, जग्गूदादाचा मोठा खुलासा

शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; तब्बल 33 जणांना कोरोनाची लागण

“असं काही घडू नये, पण घडलंच तर…”, अजित पवारांचं मोठं वक्तव्य

‘मला संपवण्याचा कट होता, एक गाडी…’; पडळकरांचा जयंत पाटलांवर खळबळजनक आरोप

‘… त्यासाठी डोकं आणि अक्कल लागते’; अजित पवारांचा नारायण राणेंना टोला