IPL 2022: मेगा ऑक्शनपूर्वी ‘या’ 3 खेळाडूंना मिळू शकते लखनऊमध्ये डायरेक्ट एन्ट्री

मुंबई | आयपीएलचा (IPL 2022) 16 वा हंगाम आता येत्या काही महिन्यांमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे आता क्रिडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं दिसतंय.

यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये आता 8 नाही तर 10 टीम असणार आहे. त्यामुळे आता आयपीएलची रंगत आणखी वाढणार यात काही शंकाच नाही.

यंदा लखनऊ (Lucknow IPL) आणि अहमदाबाद (Ahmedabad IPL) या दोन संघ नवीन सामिल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता यावेळी मेगा ऑक्शन देखील पार पडणार आहे.

आयपीएलचे दोन नवीन संघ मेगा लिलावापूर्वी सोडण्यात आलेल्या उर्वरित आठ संघांमधून तीन खेळाडू निवडू शकतात, असं बीसीसीआयने आधीच सांगितलं होतं.

त्यामुळे आता लखनऊ आणि अहमदाबाद या दोन्ही संघांच्या फ्राँन्चायझीवर सर्वांचं लक्ष लागलंय. मेगा लिलावापूर्वी उर्वरित आठ संघांनी जाहीर केलेल्या खेळाडूंमधून तीन खेळाडू निवडू शकतात.

यामध्ये दोन भारतीय आणि एका विदेशी खेळाडूचा समावेश केला जाऊ शकतो. लखनऊचा संघ भारतीय सलामीवीर के एल राहुलला संघात घेण्याची पुर्ण शक्यता आहे. तर राशिद खानवर लखनऊ आणि अहमदाबाद या दोन्ही फ्राँन्चायझींची नजर असणार आहे.

त्याचबरोबर रवी बिश्रोई, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या या दोन खेळाडूंवर देखील लखनऊची नजर असणार आहे. त्याचबरोबर मार्कस स्टोनिसवर लखनऊ डाव खेळू शकते.

दरम्यान, अहमदाबादचा श्रेयस अय्यरला संघात घेण्याचा प्रयत्न असेल. तर तर अहमदाबाद एखादा गोलंदाज कर्णधार म्हणून निवडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताबद्दल ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

 प्रसिद्ध काॅमेडियन भारती सिंहने सोडली मुंबई; समोर आलं ‘हे’ कारण

 ‘माझं 67 लाख घेतलं…’, पोलीस चौकी गाठत नेता ढसाढसा रडला; पाहा व्हिडीओ

 “…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल”; प्रताप सरनाईक यांचं रोखठोक वक्तव्य

राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता