मुंबई | भारत आणि दक्षिण अफ्रिका (India VS SA) यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत दक्षिण अफ्रिकेने भारताचा पराभव केला.
दक्षिण अफ्रिकेने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. मात्र, या मालिकेच्या अखेरच्या सामन्यात एक वेगळाच प्रकार पहायला मिळाला होता.
डीन एल्गर भारतीय गोलांदाजांचा समाचार घेत असताना आर आश्विनच्या एका षटकात पायचीत झाला. त्यावेळी मैदानावरील अंपायरने एल्गरला बाद दिले. परंतु दक्षिण अफ्रिकेने रिव्हूव घेतल्यानंतर एग्लरला थर्ड अंम्पायरने नाबाद दिलं.
त्यानंतर कोहली आणि आश्विनला राग अनावर झाला. त्यावेळी विराटने स्टंप माईक जवळ जाऊन “फक्त विरोधी नाही, तर तुमच्या संघावरही लक्ष केंद्रित करा. सर्वांच्या चुका पकडण्याचा प्रयत्न करा”, असं इंग्रजीमध्ये म्हटलं होतं.
कोहलीनंतर आश्विनने देखील असंच कृत्य केलं होतं. त्यावरून आता विराटवर टीका होताना दिसत आहे. अशातच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकन वाॅनने या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे.
कधी निर्णय तुमच्या बाजूने जातात, कधी तुमच्या विरोधात जातात. विराट कोहली हा एक महान खेळाडू आहे, पण त्याने कसोटी क्रिकेटमध्ये असं वागू नये, असं मायकल वाॅन म्हणाला आहे.
आयसीसीला हे थांबवावं लागेल, त्यांना भारतीय संघाला रोखावं लागेल. रविचंद्रन अश्विन आणि विराट जे वागले, त्यातून तुम्ही सुटू शकत नाही, असंही मायकल म्हणाला आहे.
विराट कोहलीला एकतर दंड ठोठावण्यात यावा किंवा त्याला निलंबित करण्यात यावं, अशी मागणी त्याने आयसीसीकडे केली आहे. विराटची ही कृती लज्जास्पद असल्याचं देखील त्याने यावेळी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ठरलं तर! योगी अयोध्येतून नाही तर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार
“…तर शक्यता नाकारता येत नाही”; लाॅकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य
‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया
महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार
‘नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही’; भाजपचा हल्लाबोल