नवी दिल्ली | कोरोना (Corona) रूग्णसंख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. कोरोनानं गेल्या दीड वर्षात सर्व क्षेत्रांना आपल्या कार्यक्षेत्रात ओढलं आहे. परिणामी कोरोनाचे दुरगामी परिणाम झाले आहेत.
कोरोना रोगावर मात करण्यासाठी किंवा कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण (Vaccination) हाच एकमेव पर्याय आहे. परिणामी सध्या लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.
स्पुटनिक, फायझर, कोविशिल्ड, कोवॅक्सिन या लसींचा साठा सध्या बाजारात उपलब्ध आहे. परिणामी या लसींच्या प्रभावाबाबत संशोधन करण्यात येत आहे.
स्पुटनिक व्ही आणि फायझर या दोन लसींवर अधिक प्रमाणात संशोधन करण्यात आलं. जगातील खूप देशांत या लसींवर संशोधन करण्यात येत आहे. परिणामी या लसींच्या प्रभावाबाबत माहिती उपलब्ध होत आहे.
गामालिया नॅशनल रिसर्च सेंटर आणि इटालियन स्पॅलान्झानी इन्स्टिट्यूटमध्ये दोन्ही लसींवर संशोधन करण्यात येत आहे. या संशोधनाच स्पुटनिक व्ही आणि फायझर लसींचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
ठोस वैज्ञानिक माहिती हे सिद्ध करते की, स्पुटनिक व्ही लसीमध्ये इतर लसींच्या तुलनेत ओमिक्राॅनला निष्प्रभावी करण्याची क्षमता अधिक आहे, असं गामालियाचे संचालक अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी म्हटलं आहे.
स्पुटनिक व्ही लसीचा फायदा जगाला या ओमिक्राॅनच्या संकटात मदत करेल, असंही अलेक्झांडर म्हणाले आहेत. दोन्ही संस्थांचा संयुक्त अहवाल हा डिसेंबर 2021 मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रूग्णसंख्येत अचानकपणे वाढ झाली होती. परिणामी जागतिक आरोग्य संघटनेनं लसीकरणाचा वेग वाढवण्याबाबत आवाहन केलं जात आहे.
दरम्यान, गत दीड वर्षांपासून कोरोनानं अधिक प्रमाणात विविध व्हेरियंटच्या माध्यमातून नागरिकांना चिंतेत टाकलं आहे. सध्या भारतात सीरमच्या लसींचं लसीकरण चालू आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सेक्सनंतर डोकं दुखत असेल तर गांभिर्याने घ्या, जीवावरही बेतू शकतं
शरद पवार म्हणतात, “भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले…”
…तर संपत्तीवर मुलींचा पहिला अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर
धक्कादायक! कोरोना लसीचे तब्बल ‘इतके’ डोस घेतल्यामुळे आजोबांवर FIR दाखल