मुंबई | भारताचा जलदगती गोलंदाज श्रीसंत शेवटचा आयपीएल 2013 मध्ये खेळला होता आणि त्यानंतर फिक्सिंगमध्ये गुंतल्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने त्याच्यावर सात वर्षांची बंदी घातली आणि तो संपल्यापासून तो सतत आयपीएलमध्ये (IPL 2022) खेळण्याचा प्रयत्न करत होता.
भारतीय क्रिकेट मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं यावर्षी दोन नव्या संघांचा समावेश स्पर्धेत केला आहे. परिणामी ही स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. जगातील दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
फेब्रुवारी महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. परिणामी या लिलावाकडं सध्या अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. कारण प्रत्येक खेळाडूला भल्या मोठ्या रक्कमेला खरेदी करण्यात येणार आहे.
भारतीय वेगवान गोलंदाज एस श्रीसंतचे आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण होऊ शकते. IPL 2022 च्या मेगा लिलावासाठी 590 खेळाडूंची निवड करण्यात आली होती.
निवड करण्यात आलेल्या 590 खेळाडूंपैकी श्रीसंतचा देखील समावेश करण्यात आला आहे. या लिलावात श्रीसंतला भाग घेण्यास पात्र मानले गेले होते आणि त्यांना बोली लावली जाणार आहे.
लिलावात सहभागी होण्यासाठी 1200 हून अधिक खेळाडूंनी आपली नावे नोंदवली होती, मात्र त्यापैकी केवळ 590 खेळाडूच या लिलावात सहभागी होण्यासाठी पात्र ठरले होते.
श्रीसंतने यावेळी लिलावासाठी त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये ठेवली आहे. तर आयपीएल 2021 च्या लिलावासाठी त्याने त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये ठेवली होती.
दरम्यान, यंदा 10 संघ असल्याने आता श्रीसंतला आयपीएलमध्ये जागा मिळणार का?, असा सवाल आता विचारला जातोय.
महत्त्वाच्या बातम्या –
“नितेश राणेंना अटक झाल्याशिवाय जामीन मिळणार नाही”; अनिल परब यांचा दावा
“कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे”, हिंदुस्थानी भाऊवर रुपाली पाटील कडाडल्या
रणबीरचा ‘हा’ चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोडली नोकरी, जाणून घ्या काय होतं कारण
नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळताच निलेश राणेंचा न्यायालयाबाहेर राडा, पोलिसांशी बाचाबाची
Budget 2022 | मोदी सरकारने महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या ‘या’ 3 मोठ्या घोषणा