औरंगाबाद | एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन संपण्याचं नाव घेत नाहीये. त्यात आंदोलनात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांविरोधात सरकारने कारवाईचा बडगा उचलला आहे.
आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांवर सरकारने आधीच बडतर्फीची कारवाई केली आहे. त्यात महामंडळाने आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का दिला आहे.
एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा गेल्या 2 महिन्यांपासून पगार झालेला नाही. त्यात महामंडळाचे झालेले नुकसान संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून भरून काढण्याचा महामंडळाचा निर्णय झाला आहे.
यासंबंधीचे आरोपपत्र संपकरी कर्मचाऱ्यांना देण्याचे काम महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. एसटीच्या नुकसानाला कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप या आरोपपत्रातून करण्यात आला आहे.
इमामवाडा आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी अनधिकृत व नियमांच्या बाहेर जाऊन कामबंद आंदोलन केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
7 डिसेंबर ते 26 डिसेंबरदरम्यान 3063 फेऱ्या व 3 लाख 92 हजार 222 किमी रद्द होऊन महामंडळाचे 1 कोटी 58 लाख 26 हजार 469 रूपयांचे नुकसान झाले असल्याचं महामंडळाने एका कर्मचाऱ्याला दिलेल्या आरोपपत्रात नमूद केलं आहे.
या आंदोलनात पुढाकार घेत इतर कर्मचाऱ्यांना चिथावणी दिली. महामंडळाच्या नुकसानाला आपण जबाबदार आहात, अशा मजकूराचं आरोपपत्र एका एसटी कर्मचाऱ्याला महामंडळाने पाठवलं आहे.
तर औरंगाबाद आगारातील एका कर्मचावर त्याच्यामुळे 9 लाख रूपयांचं नुकसान झाले असल्याचा ठपका आरोपपत्रातून ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांकडून आर्थिक नुकसान झाले तर ती नुकसानभरपाई कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल केली जाणार असल्याचं महामंडळाच्या अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
वजन कमी करायचंय?, थंडीच्या दिवसात आहारात करा फक्त ‘या’ सूपचा समावेश
कोरोनाचा ‘या’ अवयवावर होतोय गंभीर परिणाम?; धक्कादायक माहिती समोर
“माझ्यात आणि मोदींमध्ये एकत्र येण्यावर चर्चा झाली होती पण…”
नवीन वर्षी बजेट कोलमडणार; ‘या’ वस्तूंवरील GST वाढणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, नव्या वर्षात सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट