मुंबई | ऐन दिवाळीत राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलगीकरण करण्यात येणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना एक आवाहन केलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कळकळीचे आवाहन करत आंदोलन मागे घेण्यास सांगितलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन राजकीय पोळ्या भाजू नका, असं म्हणतं विरोधकांना चिमटे काढले आहेत.
‘एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेचं आहात. बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या काही मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा देण्याकरिता राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उच्च न्यायालयासमोर राज्य शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पावले उचचली आहेत हे सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे.
न्यायालयाच्या सुचनेप्रमाणे आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समितीची नेमणूक करून काम देखील सुरू केलं आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी म्हणाले आहेत की, अशा परिस्थितीमध्ये माझी हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरिब आणि सामान्य जनतेला वेठीस धरणारे आंदोलन करू नका, असं विनंती वजा आवाहन मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे.
आधीच आपण सर्वजण कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया राज्य शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा.
राजकाय पक्षांनी देखील गरिब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसाराच्या होळ्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नका, अशी माझी त्यांनी कळकळीची विनंती आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांनी निशाणा लगावला आहे.
ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना संघटना लेखी आश्वासन दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आता उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेणार नाही, हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“डुकराशी कुस्ती कधीच खेळू नये हे मी आधीच शिकलोय”
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले…
‘…ते प्रकरण मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन दाबण्यात आलं’; मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी
एसटी कर्मचारी आंदोलन