‘सिल्वर ओक’वर राडा! सुप्रिया सुळे हात जोडत म्हणाल्या, “माझी आई आणि मुलगी घरात…”

मुंबई | विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचारी मागील 6 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. सरकारने एसटीचं विलीनीकरण होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आज एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी आंदोलन केलं. त्यावेळी त्याठिकाणी चप्पलफेक आणि शाहीफेक झाल्याची माहिती मिळाली आहे.

शरद पवार सिल्वर ओकवर दाखल झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर काही वेळातच सुप्रिया सुळे सिल्वर ओकवर पोहचल्या. सुप्रिया सुळे यांना पाहताच कर्मचाऱ्यांनी त्यांना घेरलं.

कर्मचाऱ्यांना शांत बसण्याची विनंती सुप्रिया सुळे करत होत्या.  मात्र तरीही जमावाने आक्रमकता सोडली नाही. सुप्रिया सुळे यांना घेराव घातला. त्यावेळी त्यांनी शांत कर्मचाऱ्यांना हात जोडून शांत राहण्याची विनंती केली.

मी आत्ता त्यांच्याबरोबर या क्षणी बसायला तयार आहे. पण त्यांनी शांततेचा मार्ग धरावा, असं सुळे म्हणाल्या. दगडफेक आणि चपला आमच्यावर फेकून काहीही होणार नाही, असं त्यांनी कर्मचाऱ्यांना समजवलं.

माझे आईवडील, माझी मुलगी घरात आहेत. पहिली त्यांची सुरक्षितता मला बघू द्या. तुम्ही शांततेत बसा मी पुढच्या क्षणी चर्चेला बसायला तयार आहे, असं सुळे त्यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी कुटुंबियांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या या प्रकारानंतर आता मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी पोहोचले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

ST कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; शरद पवारांच्या सिल्वर ओकवर चप्पल फेक

राज ठाकरेंच्या कारवाईनंतर वसंत मोरेंना अश्रू अनावर, म्हणाले…

“दादा, कुछ तो गडबड है…”; चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा

‘राज ठाकरे यांना अटक करा’; अबू आझमी यांची मागणी

  ‘निर्बंध हटवले तरी…’; राजेश टोपेंचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन