“एसटी कर्मचाऱ्यांना कामावर जायचंय, पण भाजप कार्यकर्ते जाऊ देत नाहीत”

मुंबई | गेल्या 12 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण करावे ही एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्याकरिता राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.

मात्र, आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे. मात्र, भाजप कार्यकर्ते कामावर येऊ देत नाहीत, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

एसटी विलीनीकरण प्रक्रिया एक दोन दिवसात होणार नाही, त्याकरिता काही कालावधी जाणार आहे, असं स्पष्टीकरण अनिल परब यांनी दिलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनात वेळ वाया घालवू नये, असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे.

गुरूवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने राज ठाकरे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे.

बारा दिवसांच्या संपानंतर विलीनीकरण समिती स्थापन झाली आहे. न्यायालयाची पुढची तारीख आली अन् हाती काहीच लागल नाही तर काय करायचं? असा सवाल एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई न करण्याची विनंती केली आहे. दबाव तंत्राचा वापर करून कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचं सांगण्यात येत आहे, असं राज  ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

एसटी कर्मचारी संप मागे घेत नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर ‘ना काम ना दाम’ यानुसार कारवाई करण्यात येईलं, असा इशारा अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

एसटी महामंडळाने विभागीय नियंत्रकांना कठोर कारवाई करण्याचे थेट आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाचं या 12 दिवसांमध्ये 100 कोटी रूपयांचे नुकसान झालं आहे.

जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण करण्यात येत नाही तोवर संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान, अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. अनिल परब पुढे म्हणाले आहेत की, अनेक कामगारांना कामावर यायचं आहे, परंतु भाजप कार्यकर्ते कामावर येऊ देत नाहीत. आता अनिल परब यांच्या या दाव्याला भाजपकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  
हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हरामशी; सलमान खुर्शिदांच्या पुस्तकावरून नवा वाद

“देशाला 1947 मध्ये भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं”

  फडणवीस म्हणाले ‘डुकराच्या नादी लागायचं नाही’, आता नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर

  ‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात”