नवी दिल्ली | पुर्तगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) नवजात मुलाचं निधन झालं आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोनं याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिग्ज यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केलं होतं की, ते जुळ्या मुलांचं आई-वडील होणार आहेत. पण, सोमवारी रोनाल्डोने सोशल मीडियावर त्याच्या नवजात मुलाचं निधन झाल्याची माहीती दिली.
सोमवारी रोनाल्डो आणि जॉर्जिना यांच्याद्वारे संयुक्त निवेदन जाहीर करण्यात आलं. त्यात लिहिलं होतं की, ‘खूप दु:खी अंतकरणाने आम्हाला हे सांगावे लागत आहे की, आमच्या नवजात मुलाचे निधन झालं आहे. हे कोणत्याही आई-वडिलांसाठी सहन करावे लागणारे सर्वात मोठं दु:ख आहे, असं त्याने सांगितलं.
आमच्या मुलीचा जन्मच आम्हाला ताकद देत आहे आणि हे दु:ख झेलण्याची शक्ती देत आहे. आम्ही सर्व डॉक्टर आणि नर्स यांचे आभार मानतो, ज्यांनी आमची साथ दिली, असं रोनाल्डोने सांगितलं.
रोनाल्डोला11 वर्षांचा मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर, चार वर्षांची इव्हा आणि मटाओ ही जुळी मुलं तर तीन वर्षांची अलाना मार्टिन अशी चार मुलं आहेत.
रोनाल्डो हा त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना बरोबर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. त्याने ती प्रेग्नंट असताना जानेवारी 2022 मध्ये तिचा 28 वा वाढदिवस जोरदार साजरा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ
“देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका”
…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भावाला समजावून सांगावं, नाहीतर…”