अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

मुंबई |   गेल्या दीड महिन्यापासून मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे मुंबई लोकल बंद आहे. आता अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई लोकल सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मुंबई लोकल सुरू करावी ही महत्त्वाची मागणी केली आहे.

आयकार्ड दाखवून लोकलमध्ये प्रवेश द्या, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केलं. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची ने-आण करण्यासाठी सध्या लोकलची गरज भासते आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही मागणी विचारात घ्यावी, असं उद्धव म्हणाले.

दरम्यान, केंद्राने प्रायोगिक तत्वावर रेल्वे सुरू केली आहे. आजपासून रेल्वे तिकीटांची विक्री देखील सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीतून देशातल्या प्रमुख शहरांत रेल्वे धावणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राजेश राठोड की राजकिशोर मोदी? काँग्रेसचा उमेदवार कोण?

-“शासनाने काही नियम अटी लागू करुन मंदिरं खुली करावीत”

-कसाबच्या साक्षीदाराचा उपचारखर्च भाजप उचलणार; फडणवीसांकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

-महाराष्ट्रात 25 हजार कंपन्या सुरु, 6 लाख जणांच्या हाताला काम- सुभाष देसाई

-मुंबई उच्च न्यायालयाचा कुख्यात डॉन अरुण गवळीला दिलासा!