उद्यापासून कोरोनाच्या Booster डोसला सुरुवात, केंद्रानं दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

मुंबई | कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या नव-नव्या व्हेरियंटनं तर कहरच केला आहे. अशातच आता कोरोना आटोक्यात येत असून नागरिकांना थोडासा दिलासा आहे.

कोरोना नियंत्रणात आल्यामुळे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. निर्बंध हटवले असले तरी कोरोना अद्याप संपलेला नाही, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरण केलं नसलेल्यांनी लसीकरण करुन घ्यावं, असं सांगण्यात आलं आहे.

कोरोना लसीकरणाविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 18 ते 59 वर्षे वयोगटातील लोकांसाठी कोरोना लसीचा बूस्टर डोस सुरु होणार आहे. बूस्टर डोस 10 एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांशी चर्चा केली आहे.

बुस्टर डोसविषयी केंद्र सरकारनं महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. खासगी लसीकरण केंद्रांनी कोरोना लसीच्या बुस्टर डोस दरम्यान 150 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारू नये. ही कमाल 150 रुपये शुल्क कोरोना लसीच्या किंमतीपेक्षा वेगळी असेल.

ज्या व्यक्तीला लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळाला आहे, त्याच लसीचा बूस्टर डोसही मिळेल. बूस्टर डोससाठी कोणतीही नवीन नोंदणी करावी लागणार नाही.

कोविन अॅपवर आधीच केलेल्या नोंदणीद्वारे बूस्टर डोस लागू केला जाईल, असंही केंद्र सरकानं सांगितलं आहे.  ही सुविधा सर्व खाजगी लसीकरण केंद्रात उपलब्ध असेल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

आता 18 वर्षांवरील नागरिकांना 10 एप्रिलपासून खासगी केंद्रांमध्ये (खाजगी लसीकरण केंद्र) बूस्टर घेता येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात”

  आताची सर्वात मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंना ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

  धक्कादायक! ‘या’ भागात आढळला कोरोनाच्या XE व्हेरियंटचा रुग्ण

  “एवढं काम करतोय की काम करुन करुन डोक्याला आता केस राहिनात”

  “हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश, यामागे कोण मास्टरमाईंड आहे याचा शोध घेतला जाईल”