नवी दिल्ली : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: आज ईडी कार्यालयात जाणार आहेत. शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याअगोदर मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी कलम 144 लागू करत मुंबईत जमावबंदी लावली आहे.
भाजपकडून सूडभावनेने लक्ष्य केलेले शरद पवार हे आणखी एक विरोधी पक्षनेते आहेत. महाराष्ट्र निवडणुकीच्या महिनाभरआधी कारवाई करत आहेत. सरकारच्या या सूडभावनेचा निषेध करत राहुल गांधींनी सरकारवर टीका केली आहे.
पवार यांनी स्वत: ईडीसमोर हजर होण्याचा पवित्रा घेतल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. पवार ईडी कार्यालयात जाणार त्यादरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांकडून परिसरात गर्दी केली जाऊ शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे.
शरद पवारांना पाठिंबा दिल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे आव्हाडांनी आभार व्यक्त केले आहेत.
अशा काळात पक्षभेद विसरून ते पाठीशी उभे, शरद पवारांनी 50 वर्षाच्या राजकारणात अनेक विरोधी पक्षनेत्यांना मदत केली आहे. त्यांनी द्वेषाचे राजकारण कधीच केले नाही. राऊत यांचा पाठिंबा म्हणजे शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे समजतो, असं आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. @PawarSpeaks यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी व संविधानिक संस्थांचा राजकीय हत्यार म्हणून वापर करणाऱ्या @BJP4Maharashtra सरकारच्या निषेधासाठी निदर्शने करताना कार्यकर्ते. pic.twitter.com/2r7gysDpA0
— NCP (@NCPspeaks) September 27, 2019
महत्वाच्या बातम्या-
पवारांना पाठिंबा दिल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार- जितेंद्र आव्हाड- https://t.co/FyENceTtR9 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019
हिंगोलीत शरद पवार समर्थक आक्रमक; टायर पेटवून निदर्शन – https://t.co/hc8TCLubBm @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019
“धोनीने मनमानी थांबवून निवृत्तीचा विचार करावा”- https://t.co/i3qCIsvX1S #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019