रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय

पुणे | कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे सरासरी गुण देण्यात येणार आहेत. कोरोनामुळे भूगोलाचा पेपर रद्द झाला होता. त्यामुळे आता इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून भूगोल विषयाला गुण दिले जाणार आहेत.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाने याबाबतची माहिती दिली. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांना कार्यशिक्षण विषयाचे गुणही सरासरीनुसार मिळणार आहेत.

राज्यात दहावीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च 2020 दरम्यान नियोजित होती. सर्व पेपर झाल्यानंतर केवळ भूगोलाचा पेपर बाकी होता. मात्र कोरोना संकटामुळे हा पेपर आधी पुढे ढकलण्यात आला, मग शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा पेपर रद्द करत असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाने याआधी पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील इयत्तेत वर्णी लागली होती.

महत्वाच्या बातम्या-

-कामगारांचा पोटाचा प्रश्न सोडवण्याठी बीग बी अमिताभ बच्चन यांचा पुढाकार

-“आकडे जेवढे वाढतील, तेवढं लवकर आपण पीकच्या जवळ जाऊ; विरोधकांना सत्ता नसल्याने अपचन”

-देशात 64, 425 रूग्ण ठणठणीत होऊन घरी मात्र रूग्णवाढीचा आकडा चिंताजनक

-अगोदर लोकांचे जीव वाचवणं महत्त्वाचं, राजकारणाला भरपूर वेळ पडलाय- आदित्य ठाकरे

-केंद्राकडून राज्याला कोरोनाविरुद्ध उपाययोजनेसाठी एकही पैसा मिळाला नाही- वडेट्टीवार