नागपूर महाराष्ट्र

नक्षलवाद शून्यावर आणण्यासाठी सर्वशक्तीनिशी कार्यरत राहू -सुधीर मुनगंटीवार

नागपूर : नक्षलवाद हा राज्यासाठी भूषणावह नसून तो शून्यावर आणण्यासाठी सर्वशक्तीनिशी कार्यरत राहू, असा विश्वास गडचिरोलीचे नवनिर्वाचित पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

विकास कामावर खर्च करताना गुणवत्तापूर्ण कामे व्हावीत. याची दक्षता घ्यावी, असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. 

गडचिरोली जिल्ह्याच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. याची जाणीव ठेऊन अधिकाऱ्यांनी कामाची गती वाढवावी, असे निर्देश मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सुधीर मुनगंटीवार हे गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून गडचिरोलीतील नागरिकांची मागणी होती. ती पूर्ण झाल्याने गडचिरोलीमधील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. 

जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या विविध विभागाच्या आढावा बैठकीत मुनगंटीवार यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाची रक्कम वाढवली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्री तक्रार निवारण हेल्पलाईन उभारण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. 

IMPIMP