मुंबई | कोरोना महामारीनं परत एकदा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशात ठाकरे सरकारनं राज्यभरात नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे.
राज्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली आहे. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परिणामी सरकारचं हे पाऊल म्हणजे लाॅकडाऊनची दिशा असल्याची चर्चा आहे.
राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी याबाबत आपल्या स्वाक्षरीची प्रत पाठवली आहे.
- आजपासून राज्यात रात्री पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी असेल.
- रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत राज्यात जमावबंदी लागू असणार आहे.
- लग्न समारंभासाठी आता बंदिस्त ठिकाणी 100 पेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी असणार आहे. खुल्या जागेत ही संख्या 250 पेक्षा अधिक नसेल. किंवा मैदानाच्या 25 टक्के इतकी असेल.
- क्रिडा स्पर्धा, खेळांसाठी मैदानाच्या आसनक्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे.
- लग्न समारंभ, क्रिडा स्पर्धा, राजकीय काम, सामाजीक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम या व्यतीरिक्त काही असेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याबाबत निर्णय घेईल किंवा 27 नोव्हेंबर 2021 च्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाची दखल घेण्यात येईल.
- उपहारगृहे, जीम, स्पा, इत्यादींमध्ये क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची क्षमता किंवा संख्या जाहीर करावी लागेल.
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आवश्यक त्या ठिकाणी निर्बंध लावू शकतं. फक्त ते लावण्याअगोदर त्यांनी नागरिकांना त्याची कल्पना द्यावी लागेल.
- नियमांचं कठोर पालन करणं सर्वांना बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, सरकारनं ओमिक्राॅनबाबत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सध्या लाॅकडाऊन लावण्याची वेळ आली नाही पण नागरिक जर कसेही वागले तर कडक निर्बंध लावण्याचा विचार सरकार करणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…
‘…म्हणून धोनीला मेन्टाॅर केलं’; कोहली-बीसीसीआय वादानंतर नवा खुलासा
रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा
“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”