इंधन दरवाढीविरोधात 29 जूनला काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन!

मुंबई | इंधन दरवाढीवरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी 29 जूनला सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10 ते 12 या वेळत 2 तास धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय.

दररोजच्या भाववाढीमुळे पेट्रोल प्रति लिटर 9.12 रुपये तर डिझेल 11.01 रुपयांनी वाढलंय. त्यामुळे एक लिटर पेट्रोलला 87-88 रुपये मोजावे लागतायत. ही भाववाढ अशीच राहिली तर पेट्रोल 100 रुपये लिटर होण्यास जास्त दिवस लागणार नाहीत, असं थोरात यांनी म्हटलंय.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड कमी असतानाही मोदी सरकार त्याचा लाभ सामान्य जनतेला देत नाही. कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत, उद्योग-व्यवसाय अजून पूर्वपदावर आलेले नाहीत, त्यात ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे , असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

इंधन दरवाढ करुन सुरु असलेली नफेखोरी बंद करावी आणन भाववाढ तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, सोशल डिस्टन्स ठेवून तसेच मास्क लावूनच आंदोलन करण्याच्या सुचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच याच दिवशी #SpeakuponPetroleumPrices ही ऑनलाईन मोहिमही सोशल मीडियावर चालवली जाणार असल्याचं थोरात यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यातील ‘या’ भागात पुन्हा लॉकडाउन लागू

-कोरोनावरील ‘ही’ औषधं मोफत देण्याचा सरकारचा विचार- उद्धव ठाकरे

-प्रसारभारतीकडून ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला इशारा; मुलाखत ठरली वादाचं कारण

-“कोरोनाचे मृत्यू लपवायचेच असते तर…..” राजेश टोपे यांनी केला खुलासा

-ज्यांनी माझ्या शेतकऱ्याला फसवलं त्यांना हे सरकार शिक्षा करणारच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे