चार अंडी चोरणं पोलीस हवालदाराला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर अनेक विनोदी, तर कधी-कधी सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूटही असतात.

तसेच कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे खाण्या-पिण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे आजकाल चोरी करण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

केवळ चार अंड्यांच्या चोरीमुळे एका पोलीस हवालदाराला आपली सरकारी पोलीसाची नोकरी सोडावी लागली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक हवालदार पोलीस एका अंड्याच्या गाडी जवळ उभा आहे. तो अंडविक्रेता कोणतीही सुरक्षितेची काळजी न घेता आपली गाडी सोडून दुसऱ्या दुकानात अंड्यांची ऑर्डर देण्यासाठी गेला.

त्यावेळी एक हवालदार त्या ठिकाणी आला आणि जनू काही त्या अंड्यांची तो देखरेख करत असल्याचं दाखवत आहे. त्यानंतर त्या हवालदाराने त्या अंड्यांच्या ट्रेमधून दोन अंडी काढली आणि आपल्या खिशात टाकली. असं करत त्याने एकूण चार अंडी चोरली.

हा सगळा प्रकार एका कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा सगळा प्रकार एसएसपी अमनित कौंडल यांना समजल्यानंतर त्यांनी त्या पोलीस हवालदाराला आपल्या नोकरीवरून काढून टाकले. एवढेच नाही तर या प्रकाराची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही कौंडल यांनी दिले.

तसेच हा व्हिडीओ ‘पंजाब पोलीस इंडिया’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळेया कमेंट दिल्या आहेत. त्याचप्रमाणे या व्हिडीओला आतापर्यंत जवळजवळ इतक्या लोकांनी पाहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोबाईल पाहणं तरूणाच्या आलं अंगलट, पाहा व्हायरल व्हिडीओ

फ्रिज उघडताच चक्क मांजर शिरलं फ्रिजमध्ये अन्…, पाहा…

हवामानाची माहिती देताना अचानक महिला अँकरने असं काही केलं…

पत्नीची हत्या करून पतीने मृत शरीरासोबत असं काही केलं की, ते…

सलाम त्याच्या कार्याला! डिलिव्हरी बाॅयनं भर पावसात पोहचवलं…