‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख

मुंबई | शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही पेनी स्टॉक (Penny Stock) मध्ये गुंतवणूक करू शकता. हे स्टॉक खूप स्वस्त असतात आणि त्यांचे बाजार मूल्य कमी असतं. मात्र अनेक पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

एक पेनी स्टॉक असलेला मात्र आता मल्टीबॅगर स्टॉक (Stock) बनलेला शेअर (Share) आहे सुरज इंडस्ट्रीज (Suraj Industries) या कंपनीचा. सुरज इंडस्ट्रीजच्या शेअरने फक्त काही महिन्यांतच गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे

मागील वर्षी सुरज इंडस्ट्रीजचा शेअर फक्त एक रुपयात मिळत होता. त्यानंतर त्यात कित्येक पटींची वाढ झाली आहे. सुरज इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत सध्या 79.15 रुपये आहे. काही महिन्यांपूर्वी हा शेअर फक्त 1. 18. रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. अकरा महिन्यात या शेअरने दणदणीत कमाई केलीये.

शेअरने जवळपास 15 महिन्यात चांगला परतावा दिला आहे. सुरज इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 15 महिन्यांपूर्वी गुंतवलेल्या 1 लाख रुपयाचे मूल्य आज जवळपास 66 लाख रुपये झाले आहे.

सुरज इंडस्ट्रीज या कंपनीची स्थापना 1992 मध्ये झाली होती. या छोट्याशा शेअर गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती (Wealth creation) निर्माण केली आहे.

पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक अधिक जोखमीची मानली जाते. मात्र असे काही पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळेत अनेक पटींने पैसे कमावून दिले आहेत.

पेनी स्टॉक खूप स्वस्त असतात त्यामुळे त्यात सहज गुंतवणूक करता येते. मात्र अनेकदा निवड चुकल्यामुळे तोटा होण्याचा धोका असतो.

दरम्यान, कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेला लोळवल्यानंतरदेखील शेअर बाजाराने (Share Market) मागील दीड वर्षात जबरदस्त मुसंडी मारली आहे. या अस्थिर वातावरणात धाडसाने शेअर बाजारात गुंतवणूक (Investment in share market) करणाऱ्यांना बाजाराने चांगली परतफेड केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…तर राज्यात Lockdown करावं लागणार” 

 “काँग्रेस सत्तेला लाथ मारून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवेल…”

Omicron पासून बचावासाठी WHO ने जारी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना! 

दक्षिण आफ्रिकेत सर्वात वाईट परिस्थिती; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर 

“मग एसटी कर्मचाऱ्यांच्या डेथ सर्टीफिकेटवर उद्धव ठाकरेंचा फोटो छापायचा का?”