‘या’ पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 15 लाख

मुंबई | पेनी स्टॉकमधील गुंतवणूक सामान्यपेक्षा जास्त परतावा देऊ शकते. परंतु कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत असणं गरजेचं आहे. चांगला रिटर्न देणारे एक किंवा दोन शेअर्स नाहीत, तर जवळपास डझनभर असे शेअर्स आहेत, जे बाजारातल्या सर्व चढ-उतारानंतरही गुंतवणूकदारांना (Investors) चांगले रिटर्न देण्यात यशस्वी ठरलेत. क्वालिटी फार्मास्युटिकल्स (Kwality pharmaceuticals ltd) हा असाच एक मल्टिबॅगर ठरलेला स्टॉक आहे.

या पेनी स्टॉकचं मूल्य वाढण्याचा सुरुवातीचा वेग खूपच कमी होता. पण जेव्हा त्याचं मूल्य वाढण्यास सुरुवात झाली, तेव्हा तो मल्टिबॅगर स्टॉक ठरला आहे.

क्वालिटी फार्मास्युटिकल्स शेअरची किंमत वर्षभरापूर्वी 50 रुपयांच्या आसपास होती. ती सध्या 780 रुपये आहे. त्यानुसार हिशोब केला तर एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना एका वर्षात 1178 टक्के रिटर्न दिलाय.

क्वालिटी फार्मास्युटिकल्सच्या शेअरची किंमत गेल्या वर्षी 24 मार्च रोजी 49.10 रुपये होती. यानंतर या स्टॉकची किंमत वाढत गेली व गेल्या वर्षी मे महिन्यात किंमतीने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला. नोव्हेंबर महिन्यात क्वालिटी फार्मास्युटिकल्स स्टॉक 1066 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

सध्या क्वालिटी फार्माचा शेअर 779.85 रुपयांवर ट्रेड होत आहे. याचाच अर्थ वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना या शेअरने जबरदस्त रिटर्न दिलेत.

क्वालिटी फार्मास्युटिकल्स कंपनीच्या स्टॉकमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या वर्षी मार्चमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक करून सुमारे 2000 शेअर्स खरेदी केले असतील, तर आज त्यांची किंमत 15,58,000 रुपये झाली आहे. म्हणजेच वर्षभरातच एक लाख रुपयांचे 15 लाख रुपये झाले.

महत्त्वाच्या बातम्या –

‘भारतात दिवसाला 7 लाखाहून अधिक रुग्ण सापडतील’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती 

‘…तरच कोरोना टेस्ट करा’; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला 

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती; एटीएममधून पैसे काढायचे असतील तर…

 “झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”

 IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली