Stock market : आता शाळेतच विद्यार्थ्यांना मिळणार ‘शेअर मार्केट’चे धडे

मुंबई | कोरोना काळानंतर अनेकांनी शेअर बाजाराचा (Stock market) अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर काहींनी गुंतवणूक देखील केली. तर काहीजण ट्रेडिंग देखील करत आहेत. त्यामुळे आता बाजारात गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

अनेकजण सध्या बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्याने आता शेअर मार्केटमध्ये क्लासेस देखील वाढले आहेत. त्यामुळे आता असंख्य जनता आर्थिक साक्षरतेकडे वळत असल्याचं पहायला मिळतंय.

अशातच आता शाळेतल्या मुलांना शेअर मार्केटचे धडे मिळणार आहे. आठवी आणि नववी इयत्तांसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम समाविष्ट केला जाणार आहे.

बँकांचे महत्त्व, बँकांचे कामकाज कसं चालतं, रिझर्व्ह बँकेची भूमिका काय, त्याचं महत्त्वाचं कामकाज कसं असतं, शेअर मार्केट, मनी मार्केट याबद्दल माहिती देण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय पालिकेने घेतला आहे. शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

पहिल्या टप्प्यात 100 शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण मुंबई स्टॉक एक्सेंजच्या इन्स्टिट्युटकडून म्हणजेच बीएससीकडून दिले जाईल.

दरम्यान, या उपक्रमामुळे बचतीची गरज- महत्त्व आणि बचतीचा योग्य विनिमय याबद्दल माहिती देण्यात येईल. त्यामुळे शालेय शिक्षणापासून योग्य आर्थिक घडामोडींची माहिती विद्यार्थ्यांना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Ramdas Athawale: “…तोपर्यंत सरकार पडणार नाही”, रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

‘देशातील महागाई कमी होवो…’, म्हणत गिरीश बापटांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

“उसाची शेती वाढल्यानं मला काळजी वाटतेय”

“भाजपमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं” 

‘युपीए’च्या अध्यक्षपदासाठी प्रकाश आंबेडकरांनी सुचवलं ‘हे’ नाव, म्हणाले…