Top news

पोटासाठी वणवण! भूक भागवण्यासाठी तरुण रस्त्यावर सांडलेलं दूध पिऊ लागला, पाहा व्हिडीओ

Photo Credit - Manish Gupta / Twitter

नवी दिल्ली| कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात कोरोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे.

लाॅकडाऊनमुळं अनेकांचे हाल होताना दिसत आहे. असंख्य लोक बेराजगार झाले आहेत. अनेक लोकांच्या हातचे काम गेले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांची पोट भरण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरु आहे.

अशा बिकट परिस्थितीत अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडली आहे. मन सुन्न करुन टाकणारी ही घटना आहे. आर्थिक स्थिती हालाकिची असणाऱ्या लोकांवर सध्या काय अवस्था ओढवून आली आहे याची एक झलक दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सुतरखाने या ठिकाणचा आहे. एक बेघर तरुण भुकेनं व्याकुळ झाल्यामुळे रस्त्यावर सांडलेलं दूध पिताना दिसत आहे. ही मन हेलावून टाकणारी घटना घडल्याचं म्हटलं जात आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्व दुकानं किंवा घरं बंद असल्यामुळे अशा बेघर लोकांना कित्येक दिवस उपाशीपोटी जागावं लागत आहे. अशा अवस्थेत पोटाची भूक भागवण्यासाठी ते मिळेल ते अन्न खाण्याच्या प्रयत्न करत आहेत.

सुतरखाने येथील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळ एका दुधवाल्याची सायकल रस्त्यावर घसरून पडली. त्यामुळे त्याचं सर्व दूध रस्त्यावर सांडलं. दूध रस्त्यावर सांडल्यानंतर दूधवाला तेथून निघून गेला. पण त्याचवेळी भुकेनं व्याकुळ झालेल्या तरुण त्या ठिकाणाहून जात होता.

यावेळी त्यानं रस्त्यावर सांडलेलं दूध पाहिलं आणि गुडग्यावर टेकून हे रस्त्यावर सांडलेलं दूध पिऊ लागला. ही घटना स्थानिक लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित बेघर तरुणासाठी अन्नाची व्यवस्था केली.

कोरोना काळात अनेक कामगार बेरोजगार झाले आहे. त्यामुळे हाताला काम नाही, खिशात पैसा नाही आणि पोटात अन्न नाही अशी दुर्दैवी अवस्था लोकांची झाली आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन लागू केलेल्या जिल्हा प्रशासनाकडून अशा असहाय्य लोकांना रेशनही दिलं जात नाहीये. त्यामुळे अनेकांना उपाशी पोटी राहावं लागत आहे.

या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

कोरोना पॉझिटिव्ह असल्यास कोणते पदार्थ खावे? याबद्दल केंद्रीय…

रेल्वे स्थानकावरचा महिला पोलिसांचा भन्नाट डान्स होतोय सोशल…

कोरोनापासून वाचण्यासाठी महिलेनं शोधून काढला भयंकर उपाय,…

पूलावर गाडी थांबवत महिलेनं असं काही केलं की पोलिसांनी केली…

चौघांबरोबर पाचव्यालाही गाडीवर बसवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल,…

IMPIMP