सातारा | सध्या राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकाच्या निवडणुकींची रणधुमाळी पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी निकालाचे पडसाद उमटताना दिसत आहे. यातच सातारा जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीच्या निकालाचं धक्कादायक रुप पहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्यांत झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांचा 1 मतानं पराभव झाला आहे. यानंतर राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यलयावर दगडफेक केल्याची घटना घडल्याचं पहायला मिळालं.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक केल्यानं सध्या साताऱ्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचा 1 मतानं धक्क्दायक पराभव झाला आहे. ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली असून शशिकांत शिंदे यांना अवघ्या एका मतानं पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे शशिकांत शिंदेचा पराभव झाल्याच्या रागातून त्यांच्यात समर्थकांना कार्यालयावर हल्ला केला.
सातारा जिल्ह्यातील शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून 25 मतं घेत रांजणेंनी विजय मिळवला आहे. त्यामुळे सध्या याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
निवडणुकांपूर्वी दोन दिवस अगोदरही आमदार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांचे समर्थक एकमेकांमध्ये भिडले होते. आता कार्यालयावर दगडफेक करत पुन्हा एकदा नवीन वाद उभा राहिला आहे.
दरम्यान, शशिकांत शिंदेंचा जाणीवपूर्वक पराभव करण्यात आला आणि याचा निषेध म्हणूनच आम्ही पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली, असं स्पष्टीकरण यावेळी शिंदे समर्थकांकडून देण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“…अन्यथा सरकार बरखास्त करून निवडणुकांना सामोरं जा”
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती!
पुढील दोन दिवस राज्यातील ‘या’ ठिकाणी पाऊस, हवामान खात्याचा इशारा
‘सत्यमेव जयते’; मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर नवाब मलिक यांचे सूचक ट्विट
महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली धक्कादायक माहिती