“नौटंकी सिद्धार्थसाठी तरी तू नाटक करणं बंद कर!”

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे अचानक झालेले निधन हा सर्वांसाठीच मोठा धक्का होता. सिद्धार्थच्या अकाली झालेल्या मृत्यूनंतर मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली होती. अनेक बड्या कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धार्थला श्रद्धांजली वाहताना त्याच्या आठवणी शेअर केल्या होत्या.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर अभिनेत्री जासलीन मथुराने देखील सोशल मीडियावरून दु:ख व्यक्त केलं होतं. तिने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थचा एक फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली होती. तसेच एक व्हिडीओ देखील शेअर केला होता.

या व्हिडीओमध्ये ती सिद्धार्थच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त करण्यासोबतच तिच्या ट्रोलिंगबद्दल आणि तब्येतीबद्दल देखील बोलत होती. अशातच आता जासलीन आणखी काही रिल्स इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसत आहे. जासलीनच्या या रिल्सवर कमेंट करत सिद्धार्थचे चाहते तिला ट्रोल करत आहे.

नुकताच जासलीनने हॉस्पिटल मधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जासलीन शेरशाह चित्रपटातील ‘राता लंबिया’ या गाण्यावर एक्सप्रेशन देताना दिसत आहे. जासलीनच्या या व्हिडीओवर सिद्धार्थच्या चाहत्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे.

जासलीनच्या या रिलवर कमेंट करत सिद्धार्थचा एक चाहता म्हणाला की, ए नौटंकी नाटक करणं बंद कर, सिद्धार्थची जणू हिलाच आठवण येत आहे. तर आणखी एक युजर जासलीनच्या रिल्सवर कमेंट करत म्हणाला की, शॉक ओव्हर ड्रामेबाज.

दरम्यान, सिद्धार्थने 2004 साली आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरूवात केली होती. सिद्धार्थला मॉडेलिंग आणि अभिनयामध्ये फारशी आवड नव्हती. परंतू त्याच्या लूकमुळे केवळ आईच्या सांगण्यावरून त्यानं एका मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. तिथून त्याच्या करिअरला सुरूवात झाली.

डिसेंबर 2005मध्ये तुर्कीमध्ये मॉडेलिंगची स्पर्धा झाली होती. त्यामध्ये आशिया लॅटिन, अमेरिका, यूरोपमधील एकूण 40 जणांनी सहभाग घेतला होता. या 40 जणांना मागे टाकत सिद्धार्थने जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलंच विजेते पद पटकावलं होतं.

https://www.instagram.com/p/CTd9rHmoTMc/
https://www.instagram.com/p/CTT1EDoIgEA/
https://www.instagram.com/p/CTtnUx0IKf2/

महत्वाच्या बातम्या-

अंकिताच्या घरी देखील गौरीचं आगमन, पाहा खास व्हिडीओ

‘…मला अजूनही सुशांतचा आवाज ऐकू येतो’; सुशांतच्या आठवणीत त्याची एक्स गर्लफ्रेंड व्याकूळ

बोटमध्ये चप्पल घालून चढणाऱ्या ‘या’ बड्या अभिनेत्रीला अटक

सिद्धार्थची ‘त्या’ रात्रीच्या अर्ध्या तासाची कॉल हिस्टरी समोर, विशालने केला खुलासा

…म्हणून मामा भाच्यातील वाद पेटला; वाचा गोविंदा आणि कृष्णातील भांडणाचं कारण