Top news

रेल्वे स्थानकावरचा महिला पोलिसांचा भन्नाट डान्स होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यात लहान मुला-मुलींचे व्हिडीओही आपल्या पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

आपण सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हािडीओ व्हायरल झालेले पाहिले असतील. त्यामध्ये लहान मुला-मुलींचे, तरूण-तरूणींचे व्हिडीओ पाहिलेले असतील. तसेच अनेकदा अभिनेता-अभिनेत्रीही आपल्या डान्सचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर करत असतात.

परंतू तुम्ही यापूर्वी महिला पोलीसांचा डान्स पाहिला नसेल. सध्या सोशल मीडियावर महिला पोलिसांचा रेल्वे स्थानकावरचा डान्स करतानाचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये अनेक महिला पोलिस एका गाण्यावर रेल्वे स्थानकावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा डान्स रेल्वे स्थानकावरील प्रत्येक व्यक्ती टक लावून पाहत आहे. हा व्हिडीओ व्हिडीओमध्ये चेन्नई रेल्वेस्थानकावरील असून पोलीस महिला ‘एन्जॉय एन्जामी’ या गाण्यावर डान्स करत आहेत.

सगळ्या पोलीस महिला आपल्या युनिफॉर्ममध्ये असून, गाण्याच्या बिटनूसार आपलं डान्सच्या स्टेप्स बदलत आहेत. नेहमीच कडक भूमिका घेणाऱ्या पोलीसांचा हा भन्नाट डान्स व्हिडीओ पाहून अनेकजण चकित झाले आहेत.

तसेच व्हिडीओमध्ये सर्व महिला पोलिसांच्या हातामध्ये हँडग्लोज आहेत. त्याचप्रमाणे सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेले असून, या सर्व महिला पोलिसांनी यावेळी डान्स करत प्रवाशांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग समजाऊन सांगितला. या गाण्यावर यापूर्वी केरळमधील पोलिसांनीसुद्धा डान्स केला होता.

हा व्हायरल व्हिडीओ प्रमोद माधव या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यानी ‘Watch the enthralling performance by Chennai Railway Police at Chennai Central Railway station as a #COVID19 awareness program. Giving tough competition to @TheKeralaPolice’ असं कॅप्शनही दिलं आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत सहा हजार लोकांनी पाहिला असून, महिला पोलिसांच्या या डान्सवर अनेकांनी कमेंटही केलं आहे.


महत्वाच्या बातम्या-

कोरोनापासून वाचण्यासाठी महिलेनं शोधून काढला भयंकर उपाय,…

पूलावर गाडी थांबवत महिलेनं असं काही केलं की पोलिसांनी केली…

चौघांबरोबर पाचव्यालाही गाडीवर बसवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल,…

 

IMPIMP