…हा तर सत्तेचा गैरवापर; राहुल गांधींची सरकारवर टीका

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयामुळे भाजपवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काश्मीरप्रश्नावरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

लोकसभेत काश्मीरबाबत चर्चा सुरु असताना राहुल गांधींनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे.

जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. आणि याचे राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होतील, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. 

आपल्या देशातील नागरिकांनी देश घडवला आहे तो केवळ जमिनीच्या तुकड्यांनी तयार झलेला नाही. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अटकेत ठेवणे आणि घटनेतील नियमांचं उल्लघन करणे योग्य नाही, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

जम्मू काश्मीरमधील पुनर्रचना विधेयक 2019 सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले. 

लोकसभेत सरकारकडे बहुमत असल्याने हे विधेयक मंजूर होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचं समोर आलं आहे.

नव्या रचनेनुसार जम्मू काश्मीरचे विभाजन करण्यात येणाार असून लडाख हा केंद्रशासित प्रदेश करण्यात येणार आहे.  

महत्वाच्या बातम्या-

-अनाजीपंतानं उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये फूट पाडली- छगन भुजबळ

-कलम 370च्या निर्णयानंतर आता बेळगाव महाराष्ट्राला द्या- नितेश राणे

-अमित शहा भडकले; म्हणाले…त्यासाठी जीवही देऊ

-संभाजी ब्रिगेड आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चं काम करणार!

-शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य यात्रे’स सुरुवात