अजबच! कोरोना काळात व्हिडीओ काॅलवर खोकण्या-शिंकण्यासाठी माॅडेलला मिळतात लाखो रुपये

नवी दिल्ली| कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.

कोरोना काळात थोडं शिंकलं किंवा खोकलं तरी लोकं एकमेकांपासून लांब जाऊ लागतात. मात्र  तेच करून एक मॉडेल मात्र लाखो रुपये कमवते आहे.

यूकेतील 42 वर्षांची मॉडेल आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार हॉली मेग्वायर व्हिडीओ कॉलवर शिंकून-खोकूनच भरपूर कमाई करत आहे. तिच्या क्लाइंट्सकडून तिला अशी मागणी येत असल्याचा दावा तिने केला आहेत.

कोरोना काळात ग्लोबल लॉकडाऊन लागल्यामुळे ओन्ली फॅन्ससारख्या वेबसाइट्सचा बिझनेस चांगलाच वाढला आहे. कारण या साइट्सवर अनेक मॉडल्स आपल्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चांगला पैसा कमावत आहे. असं असलं तरी 42 वर्षीय मॉडल हॉली मेग्वायर दावा केला आहे की, तिला क्लाइंट्सच्या अनेक विचित्र डिमांडचा सामना करावा लागतो.

हॉली मेग्वायरने ‘द सन’ वेबसाइटसोबत बोलताना सांगितले की, तिला अनेक अशा ऑफर्स येतात ज्यात त्यांना क्लाएंट कॅमेरासमोर खोकण्याची आणि शिंकण्याची डिमांड करतात. अनेकदा 15-20 मिनिटे त्यांना असंच करण्यास सांगितलं जातं. त्यासोबतच क्लाएंटना त्यांना मास्कमध्ये बघणंही आवडतं.

अनेकदा तर शिंकणं आणि खोकणंही अशक्य होतं. मी नेहमी सोबत पेपर शेकर ठेवते, ज्यामध्ये मला शिंकणं सोपं होतं. फक्त शिंकून, खोकून महिनाभरात जवळपास ती 4 लाख रुपये कमवते.

ग्लोबल लॉकडाऊनमुळे स्ट्रिप क्लबसारखी ठिकाणे बंद झाली आहेत. हेच कारण आहे की, ऑनलाइन अनेक वेबसाइटची डिमांड वाढली आहे. लोक यावर म़ॉडल्सचे फोटो आणि व्हिडीओ बघण्यासाठी पैसे खर्च करतात, असंही हाॅलीनं म्हटलं.

महत्वाच्या बातम्या – 

पुरुषांनीही अनुभवल्या मासिक पाळीत स्त्रियांना होणाऱ्या…

लाॅकडाऊनमध्ये मोकाट फिरणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी घडवली…

दबा धरून बसलेल्या बिबट्याने रस्ता पार करत असलेल्या हरणावर…

पोटासाठी वणवण! भूक भागवण्यासाठी तरुण रस्त्यावर सांडलेलं दूध…

कोरोना पॉझिटिव्ह असल्यास कोणते पदार्थ खावे? याबद्दल केंद्रीय…