महाराष्ट्र Top news मनोरंजन मुंबई

‘…म्हणून मी 24 तासामध्ये एकदाच टॉयलेटला जातो’; अभिजीत बिचुकलेचा अजब खुलासा

Abhijit Bichukale e1638377198624

मुंबई | मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झालेला अभिजीत बिचुकले आता हिंदी बिग बॉस सिझन 15 मध्ये दिसत आहे. नुकताच राखी सावंतसोबतच अभिजीत बिचुकलेची घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे.

घरात अभिजीत बिचुकलेची एण्ट्री होताच प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन होताना दिसत आहे. दरम्यान, अभिजीत बिचुकलेने अजब खुलासा केला आहे.

बिग बॉस 15 च्या घरातील वॉशरुम एरियामध्ये राखी सावंत आणि अभिजीत जेवणासंदर्भात गप्पा मारताना दिसतात. राखी अभिजीतला विचारते ‘तुम्ही जास्त का जेवत नाहीत?’ त्यावर अभिजीतने दिलेल्या उत्तराने राखीसोबतच प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे.

टॉयलेटला जाणे हे फार कंटाळवाणं काम आहे असे अभिजीत म्हणाला. तसेच 24 तासामध्ये एकदाच टॉयलेटला जातो आणि टॉयलेटला कमी जायला लागावे म्हणून मी कमी जेवतो असा खुलासा अभिजीतने केला आहे.

मंगळवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिजीत बिचुकलेची घरात एण्ट्री झाली आहे. तसेच घरात आल्यानंतर त्याच्या जेवणावरुन भांडण देखील झाले आहे.

अभिजीत बिचुकलेने कवी मनाचे नेते अशी ओळख मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात केली होती. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात त्यावेळी जाणारे बिचुकले हे एकमेव राजकीय नेते होते.

अभिजीत बिचुकले घरातील वादामुळे कायमच चर्चेत होता. मराठी बिग बॉसमधील एका टास्क दरम्यान अभिजीत बिचुकले म्हणाला होता,”मी हा खेळ सोडत आहे. असले फालतू खेळ मला खेळायचे नाहीत”.

महत्त्वाच्या बातम्या- 

राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का; 25 वर्ष आमदार राहिलेला ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर 

Twitterचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांना आहे इतका पगार; आकडा ऐकून थक्क व्हाल

फक्त ‘या’ एका गोष्टीमुळं पतंगराव वसंतदादांच्या नजरेत भरले!, पुढं आयुष्य बदललं 

‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ’; ‘या’ शिवसेना नेत्याचा तटकरेंना टोला