नाचत-गात हजारो प्रेक्षकांपुढे आली अन् टॉप निसटला, प्रसिद्ध गायिकेचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई | मोठ्या गाजावाजात धुमधडाक्यात सर्वांनी नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे. पण एका कार्यक्रमात मात्र भलताच प्रकार स्टेजवर घडलेला सध्या चर्चेत आहे.

प्रसिद्ध हाॅलिवूड गायिका माइली सायरसची ओळख एक प्रभावी गायिका म्हणून आहे. आपल्या गायनानं माइलीनं अनेक कार्यक्रम गाजवले आहेत. पण तिचा 2022 च्या स्वागताचा कार्यक्रम मात्र वेगळ्याच कारणासाठी गाजत आहे.

माइली एक न्यू इअर काॅंन्सर्टमध्ये गाण्याचा कार्यक्रम करत होती. आपल्या कार्यक्रमादरम्यान माइलीला वार्डरोब मालफंक्शन या प्रकाराचा शिकार व्हावं लागलं आहे.

माइली ही गाणं गाण्यासाठी स्टेजवर आल्यानंतर अचानक तिचा टाॅप निसटला आणि लगोलग हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गायिका माइली सायरसने हा सर्व प्रकार फारच धाडसानं आणि प्रसंगसावधानतेनं हाताळला आहे. अभिनेत्रीनं घाबरून न जाता अतिशय बुद्धिमत्तेने या घटनेला सांभाळून घेतलं, परिणामी माइलीचं कौतुक देखील केलं जात आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं नाव माइली न्यू ईयर इव पार्टी असं होतं. यामध्ये गायिका सुंदर अशा सिल्व्हर कलरच्या ड्रेसमध्ये गाणं गात होती.

उपस्थित लोक तिच्या गाण्याचा प्रचंड आनंद लुटत असतानाच हा प्रकार घडला आहे. माईली लगोलग स्टेजच्या मागं गेली आणि लाल रंगाचा ब्लेजर घालून परत आली जसंकी काही घडलंच नाही.

दरम्यान, माइलीचा हा व्हायरल व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नकारात्मक प्रतिक्रिया येत असल्या तरी मोठ्या प्रमाणत तिच्या प्रसंगसावधनतेचं कौतूक होत आहे.

पाहा व्हिडिओ –

महत्वाच्या बातम्या –

 अभिनेते प्रेम चोप्रा लिलावती रूग्णालयात दाखल, तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

‘या’ एका गोष्टीमुळे सनी लिओनीला आजही होतोय त्रास, केला मोठा खुलासा

मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!

 कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…

 …म्हणून भर स्टेजवर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडीओ