जाणून घ्या! कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहता पुणेकरांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

पुणे | कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पुण्यात झपाट्याने वाटत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्याही मोठी होताना दिसतीयेे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणि होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंञण करणे गरजेचं आहे.

रुग्णांची संख्या लक्षात घेता महानगरपालिकेने नागरिकांवर कडक निर्बंध लावले आहेत. पण तरीही रुग्णांची संख्यांमध्ये काही घट होताना दिसत नाहीय. त्यामुळे त्यावर प्रतिबंधनात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. म्हणून कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर पुण्यात ‘होळी आणि धुलवड’ या सणांवर बंदी घालण्याल आली आहे.

28 मार्च रोजी होळी आणि दुसऱ्या दिवशी असलेल्या धुलवड असल्याने हा उत्सव पुण्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. माञ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उत्सवामुळे नागरिक एकञ आल्यास धोका अजून वाढू शकतो. म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. तसेच या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.  त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे या वर्षी देखील पुणेकरांना होळी आणि धुलवड सोजरी करता येणार नाही.

तसेच खास करून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे मुख्यतः सार्वजनिक ठिकाणे , हॉटेल्स, रिसॉर्ट, खाजगी मोकळ्या जागा , सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक मोकळ्या जागा आणि सर्व गृहनिर्माण संस्था अशा ठिकाणी होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी करण्यास सक्त मनाई केली आहे. आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल.

कोरोनाच्या प्रादुर्भावच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच 28 मार्च 2021 रोजी होळी आणि दुसऱ्या दिवशी 29 मार्चला साजरा होणारा धुलवड साजरे करण्यास मनाई केली आहे. सदर आदेशाचं पालन करून नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन राजेश देशमुख यांनी केले आहे.

दरम्यान, जे कोणी या आदेशाचा पालन करणार नाही, त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

 महत्वाच्या बातम्या-

“तुमच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता होणार…

आज सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा…

‘काम हवं असेल तर……’ अंकिता लोखंडेचा…

मोठी बातमी! बीड जिल्ह्यात ‘इतके’ दिवस लॉकडाऊन…

“मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी बोलतं…