पणजी | पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून राज्यांत निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत. अशातच गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election 2022) जिंकण्यासाठी प्रत्येक पक्षानं कंबर कसली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत कोणताही पक्ष किंवा उमेदवारासाठी प्रचार न करण्याचे कडक निर्देश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रचार करताना आढळल्यास कामावरून काढून टाकलं जाईल, असं परिपत्रक महिला आणि बालविकास खात्याने जारी केलं आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून सरकारविरोधी प्रचार होण्याची भीती असल्यानेच हे परिपत्रक जारी केल्याचा आरोप करत ॲड. हृदयनाथ शिरोडकर यांनी पत्रकाचा निषेध केला आहे
काही ठिकाणी शिक्षकांना उमेदवार प्रचारात गुंतवत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या अनुषंगाने आता महिला आणि बालविकास खात्याने परिपत्रक जारी केले आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून सरकारविरोधात प्रचार केला तर त्याचा जबर फटका आगामी निवडणुकांमध्ये बसेल. त्यामुळे सरकार घाबरलं आहे आणि म्हणून वरील परिपत्रक जारी केलं आहे, असं हृदयनाथ शिरोडकर यांनी म्हटलं आहे.
आमचा या परिपत्रकाला विरोध आहे. एका बाजूने खाते त्यांना स्वेच्छा कर्मचारी म्हणतात आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करतात, असंही ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
यशोमती ठाकूर यांनी केलेल्या टीकेला बच्चू कडूंचं प्रत्युत्तर, म्हणाले ‘भूत लागल्या प्रमाणे…’
राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
आठवड्यापासून बेपत्ता डूग्गू कसा सापडला?, वाचा काय घडलं?
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर
तुमच्याजवळ फाटलेल्या नोटा आहेत?, वाचा कशा बदलाल या नोटा?, जाणून घ्या