‘लक्षात ठेवा त्याच कबरीमध्ये तुम्हाला जावं लागेल’; एमआयएमविरोधात शिवसेना आक्रमक

मुंबई | एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवैसींच्या औरंगाबाद दौऱ्यावरून राज्यात जोरदार राजकारण तापलं आहे. अशात आता शिवसेना नेते संजय राऊतांनी ओवैसींवर जोरदार हल्ला केला आहे.

ओवैसी औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवण्यासाठी गेल्यानं वाद वाढला आहे.

वारंंवार महाराष्ट्रात यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकायचे असं सतत ओवैसी बंधु करत आहेत, हे महाराष्ट्राला डिवचण्यासाठी केलं जात आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

मी आज इतकंच सांगेन तुम्ही ज्या औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकत आहात त्या औरंगजेबाला कबरीमध्ये मराठ्यांनीच घातलंय, असं राऊत म्हणाले आहेत.

कधीतरी तुम्हाला देखील त्याच कबरीमध्ये जावं लागेल, असं म्हणत राऊतांनी ओवैसी बंधुंना थेट इशारा दिला आहे. परिणामी वाद वाढण्याची शक्यता आहे.

भाजपकडून देखील ओवैसी बंधुंवर जोरदार टीका करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वाद होता. आता ओवैसींच्या वक्तव्यांची भर त्यात पडली आहे.

दरम्यान, राज्यात आता नव्या वादाला तोंड फुटलं असल्यानं महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते एमआएमवर जहरी टीका करत आहेत.

महत्त्वाच्या  बातम्या – 

 मोठी बातमी! पुणे रेल्वे स्थानकावर बाॅम्ब सदृश्य वस्तू

 ‘मनी लाॅंड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

 कोण होणार ‘IPL 2022’ चा बादशहा?, दोन संघ बाहेर पडताच आठ संघांमध्ये चुरस

 ‘किधर छुप्या है अमित ठाकरे…’; दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

“ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर काय बोलू?, त्यांची लायकी नाही”