आर्चीचा फोटो पाहून परश्या दिवाना, अशी कमेंट केली की… झाले सगळेच सैराट

मुंबई |  सगळीकडं सध्या नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटाची धामधुम चालू आहे. अवघ्या महाराष्ट्रासह देशभरातील चित्रपट समीक्षकांकडून कौतूक होत आहे.

सामाजिक उणिवा जगाच्या समोर आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून मंजुळेंनी दाखवल्या आहेत. अगदीच प्रवाहाच्या बाहेरील माणसांना चित्रपटात घेण्याचं काम देखील त्यांनी केलं आहे.

सैराट या चित्रपटातून नागराज मंजुळेंनी प्रेक्षकांच्या भेटीला परश्या आणि आर्चीची जोडी आणली होती. या जोडीला प्रेक्षकांची भरपूर साथ लाभली.

सैराटच्या यशानं रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या अभिनयाचं कौतूक जगानं केलं आहे. अश्यात परत एकदा दोघंही चर्चेत आहेत.

रिंकू राजगुरूनं आपल्या इन्स्टाग्रामवर साडी घातलेले मनमोहक फोटो पोस्ट केले आहेत. अगदी घायाळ करणारे हे फोटो पाहून रिंकुच्या सौंदर्यावर अनेकजण भाळत आहेत.

रिंकुच्या या फोटोवर आकाश सैराट  झाला आहे. आकाशनं लव रिअॅक्ट करत कमेंट केली आहे. परिणामी सध्या या दोघांची चर्चा रंगली आहे.

सैराटच्या अफाट यशानंतर परश्या आणि आर्चीची जोडी झुंडमध्ये एकत्र पहायला मिळाली होती. या जोडीला प्रेक्षकांनी पसंत केलं आहे.

दरम्यान, दोघांच्या अफेअरच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. पण अद्यापही दोघांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ प्रसिद्ध IT कंपनी देणार तब्बल 60 हजार भारतीयांना नोकरी

 Deltacron: डेल्टाक्राॅनमुळं टेन्शन वाढलं! जाणून घ्या किती धोकादायक आणि काय आहेत लक्षणं?

राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका! विशेषाधिकार वापरत रद्द केला ‘तो’ मोठा निर्णय

 सर्वात मोठी बातमी; कोरोनाबाबत WHO चा जगाला अत्यंत गंभीर इशारा

अत्यंत महत्त्वाची बातमी; LPG सिलेंडरच्या दरात झाला मोठा बदल