विद्यार्थ्यांना प्रार्थना आणि प्रतिज्ञेनंतर म्हणावी लागणार ‘संविधानाची उद्देशिका’; शासनाचा स्तुत्य निर्णय

मुंबई |  राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ‘सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचे’ हा नवा शालेय उपक्रम सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. 26 जानेवारीपासून प्रत्येक शाळेत प्रार्थना आणि प्रतिज्ञेनंतर परिपाठाचा एक भाग म्हणून संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन होणार आहे.

भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता सगळ्या नागरिकांना समजावी तसेच घटनेतील समता, बंधूता आणि न्याय ही मुलतत्वे समाज मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय होणे आवश्यक आहे. या वयात मुलांच्या संस्कारक्षम मनात याची रूजवणूक झाल्यास जबाबदार व सुजाण नागरिक घडवण्यास मदत होईल म्हणून शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन होणे महत्त्वपूर्ण आहे, असं गायकवाड यांनी म्हटलंय.

4 फेब्रु. 2013 लाच शासनाने हा निर्णय घेतला होता. परंतू या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे. यापुढे शाळांमध्ये परिपाठाच्या वेळी प्रार्थना आणि प्रतिज्ञेनंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन होणार आहे.

दरम्यान, शिक्षणमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. दोनच दिवसांपूर्वी शिक्षकांना अशैक्षणिक काम करावं लागणार नाही, यासंबंधीचा निर्णय घेणार असल्याचं गायकवाड यांनी घोषित केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-छत्रपती शिवराय आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या तानाजी मालुसरेंचा अपमान; सुप्रिया सुळे संतापल्या

-“शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प का बसलेत??”