बॉयफ्रेंडसोबत स्टंट करणं तरूणीला पडलं महागात, पाहा व्हिडीओ

मुंबई | आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ मजेशीर आणि हस्यास्पद असतात. तर काही खूपच धक्कादायस आणि भितीदायक असतात.

तसेच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हटलं की, एकमेकांसोबत बाहेर फिरणं हे आलंच. त्याचप्रमाणे मजा-मस्ती करणं, एकमेकांची मस्करी करणंही आलंच. परंतू या आधी तुम्ही कधी गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडसोबत स्टंट करताना पाहिलं आहे का?, नसेल पाहिलं तर याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरूणी आपल्या बॉयफ्रेंडचा चांगलाच पचका करताना दिसून येतं आहे. आपल्याला माहित आहे की, कोणत्याही प्रकारचा स्टंट करणं हे खूप अवघड असते. त्याच्यासाठी तुम्हाला दररोज मेहनत आणि प्रॅक्टिस करावी लागते. तेव्हा कुठं आपल्याला स्टंट करता येतो.

व्हिडीओमध्ये एक तरूण एका बाकड्यावर झोपलेला पाहायला मिळत आहे. काही वेळाने त्या ठिकाणी एक तरूणी येते आणि तरूणाच्या कपाळावर अर्धी भरलेली पाण्याची बॉटल ठेवते.

बॉटल ठेऊन झाल्यानंतर तरूणी एक नऊ-दहा पाऊलं मागे जाते. त्या ठिकाणी एक फूटबॉल ठेवलेला असतो तो हातात घेते आणि आपल्या पायाजवळ ठेवते. तिला तो बॉल पायाने मारून त्या बॉलने तरूणाच्या कपाळावर ठेवलेली बॉटल खाली पाडायची असल्याचं व्हिडीओ पाहून समजतं आहे.

ती तो बॉल आपल्या पायाजवळ ठेवते आणि निशाणा साधून जोरात आपल्या पायाने तो बॉल लाथडते. तर बॉल डायरेक्ट त्या बॉटलला न लागता त्या तरूणाच्या गालावर खूप जोरात बसतो.

बॉल जोरात मारला असल्यामुळे त्या तरूणाला तो खूप लागतो आणि ताडकन जागा होतो. हे पाहून ती तरूणीला कसतरी वाटतं असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

https://twitter.com/HldMyBeer/status/1433920765087322114?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1433920765087322114%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fgirlfriend-kick-ball-and-trying-to-shoot-bottle-on-boyfriend-head-stunt-goes-wrong-video-viral-mhpl-600684.html

महत्वाच्या बातम्या-

डान्स करायच्या नादात चक्क टीव्हीच घेतला अंगावर, पाहा चिमुकलीचा मजेशीर व्हिडीओ

अभिनेता सोनू सूदने केलेला स्टंट पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! सिद्धार्थ शुक्ला प्रकरणी पोलिसांनी दाखल केला गुन्हा

पाण्यात उडी मारायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

‘सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होऊ शकत नाही’, सिद्धार्थच्या जिम ट्रेनरचा खळबळजनक दावा