‘मोदींच्या डोक्यातील विचार शरद पवारांना कळतात..’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा मोदींना टोमणा

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. पंतप्रधान मोदींच्या या घोषणानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी उपहासात्मक टिप्पणी केली आहे.

उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब निवडणुकीत शेतकरी प्रश्न विचारतील म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शेतकरीविषयक वादग्रस्त कायदे मागे घेतल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल केली.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधनांवर नेहमी टीका करणारे सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदी यांना आणखी एक टोमणा मारला आहे. मोदींच्या डोक्यातील विचार शरद पवार यांना कसे कळतात, असा चिमटा सुब्रमण्यम् स्वामी यांनी काढला.

पालघर जिल्ह्यातील कोदाड गावात खासदार दत्तक ग्राम योजनेअंतर्गत एका विकास कामाचे उद्घाटन करण्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांना विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

लोक सांगतील मोदी शेतकऱ्यांना समजावण्यात अपयशी झाले, म्हणून हे कायदे रद्द केले. पण या निर्णयामागे कोणता हेतू होता, याची आम्हाला चिंता नाही. आता रद्द झाल्यानंतर निवडणूक आल्या म्हणून रद्द करण्यात आलं, म्हटलं जातंय. याचा अर्थ बाकी सगळे मूर्ख आणि फक्त शरद पवार बुद्धीशाली आहेत, असं आम्ही कसं मानायचं, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणालेत.

तिन्ही कृषी कायद्यांबाबत विरोधी पक्षांनी केवळ टीका केली. कोणतीही सकारात्मक गोष्ट केली नाही, असे ते म्हणाले. विरोधकांकडे कोणतीही योजना नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

शेतकऱ्यांचे जेवढे शोषण काँग्रेसच्या काळात झालं, तेवढे आजवर कधीही झालं नाही, असंही सुब्रमण्यम् स्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे मागे घेण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुढच्या वर्षी IPL खेळणार का?; ‘थाला धोनी’ म्हणतो… 

 एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याची शक्यता; ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

खट्टी मीठी यारी! तीन पक्षातील तीन दिग्गज नेत्यांचा एकाच सोफ्यावर बसून हास्यकल्लोळ

“आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला”