देश

या दिवसापासून राम मंदिराच्या उभारणीला सुरूवात- सुब्रमण्यम स्वामी

Subramnian SwamyPTI 660

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या राम मंदिर-बाबरी मशिद वाद खटल्याचा निकाल मंदिराच्या बाजूनेच लागेल, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.

अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीला नोव्हेंबरपासून सुरुवात होईल, असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. सुब्रमण्यम स्वामी हे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत.

प्रत्येक नागरिकाला त्याच्या इच्छेनुसार प्रार्थना करण्याचा अधिकार घटनेनेच दिला असून तो कुणी काढून घेऊ शकत नाहीत, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलं आहे.

राम जन्माच्या ठिकाणी राम मंदिरच उभं राहणार. ते कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनीही राम मंदिर उभारणीसाठी वेगाने पावले उचलण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती.

महत्वाच्या बातम्या-