पोलीस हवालदाराची लेक झाली कलेक्टर; वाचा सातारच्या स्नेहलची थक्क करणारी संघर्षगाथा

स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणं हे महाकठीण काम. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा तर आशिया खंडातील सर्वात अवघड परीक्षा समजली जाते. अगदी खेड्यापाड्यातून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, लाखो विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करत असतात. कलेक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून हा प्रवास अखंड चालू असतो.

snehal 2

स्नेहल धायगुडे यातीलच एक नाव. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्नेहा कलेक्टर झाली. शेतकरी कुटुंबातल्या या मुलीनं आपल्या स्वप्नांसाठी केलेल्या कष्टांची पराकाष्टा वाचाल तर तुम्हीही थक्क व्हाल. आभाळाला गवसणी घालणाऱ्या स्नेहलची यशोगाथा आज आपण जाणून घेऊया.

snehal 4

खंडाळा तालुक्यातील खेड बोरी नावाचं छोटसं गाव. या लहानशा गावात शेतकरी कुटूंबात स्नेहलचा जन्म झाला. स्नेहलचे वडील पोलीस खात्यात काम करत होते. आईचं शिक्षण जेमतेम सातवी झालेलं. आपल्याला हवं तेवढं शिकता आलं नाही, ही बोचणी त्यांच्या मनाला सतत टोचत होती. म्हणूनच स्नेहलनं भरपूर शिकावं हे त्यांच स्वप्न होतं.

snehal 3

गावात स्नेहलला शिकण्यासाठी पोषक वातावरण नव्हतं. म्हणून आई वडिलांनी सहावीत असतानाच तीला हाॅस्टेलला ठेवण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील मुलींना अनेक प्रकारची बंधन असतात. घरकामात मदत करणं, स्वयंपाक बनवणं या कामात त्यांना अक्षरशः जुंपलं जातं. मात्र स्नेहल या काळात अगदी पूर्णवेळ आपल्या अभ्यासाला देत होती.

snehal 7

 

स्नेहलची सुरुवातीपासूनच एक हुशार मुलगी म्हणून ओळख होती. स्नेहल बारावी उत्तम गुणांनी पास झाली. आता यापुढे मेडिकल किंवा इंजिनीअरिंगला ती प्रवेश घेणार असे सगळेच कयास बांधू लागले. मात्र स्नेहलनं शेतीमातीच्या संबंधीत बीएस्सी अ‍ॅग्री करण्याचा निर्णय घेतला.

snehal 8

स्नेहलच्या निर्णयावर सगळेच हसू लागले. एखाद्या मुलीनं शेतीचा अभ्यासक्रम करावा हे त्यांच्या पचनी पडत नसावं, मात्र स्नेहलचा निर्णय ठाम होती. तुला जे काही मनापासून वाटतंय ते तू कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत, असं म्हणत स्नेहलच्या वडिलांनी तिला बराचसा आधार दिला. स्नेहलनं बारामतीच्या शारदानगर कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला अन तिच्या यशाची घोडदौड सुरूच राहिली.

snehal 5

पदवीच्या अभ्यासक्रमाला असतानाच स्नेहलनं यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. काॅलेज सांभाळत स्पर्धा परीक्षांचा खडतर अभ्यासही तीनं पेलला. सुरूवातीच्या टप्प्यात तिला बरेच अडथळे आली. सुमार इंग्रजी, न्यूनगंड, आत्मविश्वासाची कमतरता इ. आव्हानांवर मात करत स्नेहलनं ही परिक्षा दिली.

वयाच्या २१ वर्षी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तीनं आपलं स्वप्न साकार केलं. शेतकरी कुटूंबातील पोर ते कलेक्टर बनण्याचा तिचा प्रवास सर्वांना प्रेरणा देणारा आहे. राज्यातील सर्वात तरूण महिला अधिकारी बनण्याचा मानही तिनं यानिमित्ताने पटकवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-चीनला आर्थिक झटका देण्याची भारताची तयारी; ‘हा’ प्रोजेक्ट रद्द होण्याची शक्यता

-कोकणातल्या नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, केला मोठा निर्णय जाहीर

-सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानवर होत असलेल्या आरोपांवर सलीम खान म्हणाले…

-ठाकरे सरकार जातीय आणि धर्मवादी, वाढत्या जातीय हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची टीका

-पुढचे दोन आठवडे धोक्याचे; जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा