मुंबई | आपल्याला माहित आहे की, खूप लोकांना प्राणी आवडतात. ते पाळीव प्राणी असू किंवा जंगलातले. काहीजण तर टीव्हीवर म्हणा नाहीतर फोनवर सतत प्राण्यांचेच कार्यक्रम पाहत असतात.
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओमध्ये दोन प्राण्यांची हाणामारी सुरू असते. तर काही व्हिडीओमध्ये एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत असल्याचं पाहायला मिळत असतं. याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तसेच जंगलातला कोणताही प्राणी म्हटलं की, त्याच नाव जरी काढलं तरी थोडी का होईना सर्वांनाच भितीही वाटतंच असते. जर तुमच्या समोर जंगलातला एक मोठा प्राणी समोर आला तर तुम्ही काय कराल?, तुमची त्यावेळी काय अवस्था होईल? सहाजिक तुमची पळता भुई होऊन जाईल.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक भलं मोठं अस्वल एका चार चाकी गाडीवर चढलेलं दिसून येतं आहे. ते त्या गाडीच्या टपावर असून, त्या ठिकाणी उभं राहून त्या गाडीला खूप निरखून पाहत आहे.
त्याचप्रमाणे त्या गाडीच्या आतमध्ये कोणी आहे की नाही हेही ते पाहत असल्याचं दिसून येतं आहे. अस्वलाचा हा व्हिडीओ एका इंस्टाग्राम यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच अस्वल ज्या गाडीवर चढलं आहे, त्या गाडीमध्ये कोणी माणूस आहे की नाही. हे अद्याप समजू शकलेलं नाही.
महत्वाच्या बातम्या-
झोपलेल्या चिमुकल्या जवळ जाऊन कुत्र्यानं जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हायरल व्हिडीओ
काय सांगता! माणसांप्रमाणे चक्क पक्षीही करतोय चोरी, पाहा व्हिडीओ
ओव्हरटेक करायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ
‘मी नास्तिक आहे, धर्मामुळे माझी…’; सैफ अली खानचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
‘पती पत्नी और वो’ नवऱ्याला बायकोनं पकडलं रंगे हात, पाहा व्हायरल व्हिडीओ