बापरे! विमानतळावर अचानक आला साप अन् मग…; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर नेहमीच वेगवगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ आपल्या अंगाचा थरकाप उडवतात. सध्या सोशल मिडियावर एका विमानतळावरील असाच अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक विषारी साप थेट विमानतळाच्या प्रतिक्षागृहात पोहोचल्याचं दिसत आहे. प्रतिक्षागृहातील बाकांच्या खालून हा साप सरपटत जाताना दिसत आहे. साप सरपटत जात असतानाचा हा व्हिडीओ एका प्रवाश्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता. सध्या हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साप म्हटलं तरी अनेकांच्या अंगाचा थरकाप उडतो. पृथ्वीवरील सर्वाधिक विषारी प्राण्यांपैकी साप एक समजला जातो. सापाचा एक दंश व्यक्तीला यमलोकात पोहोचवू शकतो. हाच साप जर तुम्ही बाकावर बसलेला असताना तुमच्या बाकाखाली अचानक दिसला तर?

तुमच्या अंगाचा देखील अक्षरशः थरकाप उडेल. हीच घटना एका विमानतळावर घडली आहे. विमानतळाच्या प्रतिक्षागृहात अनेक लोक बसलेले असताना बाकाखालून एक साप जाऊ लागतो. यामुळे प्रतिक्षागृहातील लोकांची एकंच धांदल उडते.

प्रतिक्षागृहातील लोक बॅगा जागेवर ठेवून तिथून पळ काढतात. प्रतिक्षागृहात सापामुळे एकंच गोंधळ उडतो. आजंच ‘द सन’च्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. संबंधित व्हिडीओ हा 2018 वर्षातील आहे. 3 वर्षांपूर्वीची हा व्हिडीओ सध्या पुन्हा नव्याने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या विमानतळावरील आहे, हे समजू शकलं नाही.

द सनने हा व्हिडीओ शेअर करताच अवघ्या दोन तासांत 61 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. द सनने हा व्हिडीओ शेअर करताना त्यावर कॅप्शन दिला आहे की, कल्पना करा, तुम्ही विमानतळावर बसला आहात आणि अचानक तुम्हाला असं दृश्य दिसतं.

दरम्यान, काही लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट देखील केला आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच लोकांनी याला भरभरून लाईक देखील केलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बोंबला! कैद्याच्या प्रेमात पडलेल्या महिला जेलरने केलं असं काही की आज आहे गजाआड

मुलुंडमध्ये भर रस्त्यात ‘हा’ तरुण पोलिसांना शिवीगाळ करत अंगावर धावला अन् मग…; पाहा व्हिडीओ

मुंबईतील ‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन!

‘या’ कारणामुळे अभिनेता अमिताभ बच्चन यांनी डावा हात खिशात घालून केलं होतं ‘शराबी’चं शुटिंग, वाचा काय होतं कारण

अभिनेत्री प्रियंका चोप्रा विमानात पिली होती दारु अन्…,…