अचानक सापडला सोन्याचा डोंगर; सोनं लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली| अलिकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याची मा.गणी प्र.चंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भा.व देखील गगनाला भि.डले आहेत. सोनं खरेदी करणं हे सामान्य नागरिकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत.

सोन्याचे वाढते दर पाहता जर तुम्हाला फुकट सोने मिळाल्यास काय कराल? ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. फुकटचंं सोनं मिळवण्याची संधी कोणीच गमावणार नाही. प्रत्येकजण जितकं जमेल तितकं सोनं ओरबडण्याचा प्रयत्न करेल. अशीच एक घटना आफ्रिकेमध्ये घडली आहे.

आफ्रिकेच्या काँगोमध्ये सोनं खोदण्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रकार अहमद अल्गोहबारी यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर ट्विट केला असून त्याला, सोन्यानं भरलेला डोंगर पाहून काँगोच्या ग्रामस्थांना धक्का बसला आहे.

मध्य आफ्रिकेच्या काँगोमध्ये एक सोन्याचा डोंगर सापडला आहे. ज्यामध्ये 60 ते 90 टक्के सोनं असल्याचं सांगितलं जात आहे.

आफ्रिकेच्या काँगोमध्ये राहणाऱ्या लोकांना या डोंगराची माहिती मिळताच हजारो ग्रामस्थांनी सोने लुटण्यासाठी धाव घेतलीय. काँगो देशाच्या बर्‍याच भागात सोन्याचं अस्तित्व आहे. त्यामुळे तिथं सोन्याची खाण असणं ही सामान्य बाब आहे. मात्र लोकांनी सोनं लुटण्यासाठी तुफान गर्दी करत खाणकाम करण्यास सुरूवात केली आहे.

सोन्याची लूट करण्यासाठी प्रचंड गर्दी वाढल्यानंतर खाणकाम करण्यास त्वरित बंदी घालण्यात आली आहे, जेणेकरून लोक नोंदणीनंतरच खाणकाम करू शकतील.

 

महत्वाच्या बातम्या –

देवेंद्र फडणवीसांच्या काळात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर झाला, पण…- अशोक चव्हाण

मोठी बातमी; नाणाक प्रकल्पासाठी शरद पवारांचा राज ठाकरे यांना फोन, म्हणाले….

महिला दिनाच्या दिवशी अमृता फडणवीसांचा ‘हा’ व्हिडीओ व्हायरल, म्हणाल्या…

कौतूकास्पद! सासू-सासऱ्यांनी केलं सूनेचं कन्यादान; ‘या’ अनोख्या विवाहाची सगळीकडे चर्चा

‘तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही’ – राज ठाकरे