मुंबई | सोशल मीडियावर बाईक स्टंटचे वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. बाईक स्टंटच्या या व्हिडीओजमध्ये काही तरुण आपल्याला दोन्ही हात सोडून बाईक चालवताना दिसतात. तर काही तरुण बाईकवर उभे राहून स्टंट करताना दिसतात. मात्र, हे स्टंट करणं अनेकदा तरुणांच्या चांगलंच अंगलट येतं.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका तरुणाचा बाईक स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र, बाईक स्टंट करणं या तरुणाच्या चांगलंच अंगलट आलं आहे.
भरधाव बाईकवर स्टंट करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील धडकी भरेल. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसेल की, एक तरुण भरधाव वेगाने बाईक चालवत आहे. हा तरुण बाईक दोन्ही चाकांवर नव्हे तर केवळ एका चाकावर चालवत असतो.
चालू बाईकवर हा तरुण पुढील चाक उचलतो आणि मागील चाकावर बाईक भरधाव वेगाने पळवतो. तो ज्या रस्त्यावर बाईक चालवत आहे तिथे इतरही गाड्या येत जात आहेत. हा स्टंट करताना बाईकस्वाराचं बाईकवरील नियंत्रण अचानक सुटतं आणि त्याचा तोल जातो.
यानंतर हा तरुण बाईक सावरण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याचा तोल जातो. तोल गेल्यानं तो बाईकच्या एका बाजूने खाली कोसळतो. बाईक खूप जोरात असल्याने हा तरुण बाईकवरून खाली कोसळला तरी देखील बाईक आपोआप पुढे जाते. बराच अंतर पुढे जाऊन ही बाईक देखील कोसळते.
ज्यावेळी या तरुणाचा तोल जावून तो खाली कोसळतो, त्यावेळी सुदैवाने रस्त्यावर इतर कोणी नसते. यामुळे या तरुणाचा जीव वाचतो आणि त्याला गंभीर ईजा होत नाही. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समोर आलं नाही.
दरम्यान, vip.chopbar नावाच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण या तरुणाच्या जिवाबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
जिममध्ये तरुणावर अदृश्य शक्तीने केला हल्ला अन्…; हलक्या काळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नका
सीतेच्या भूमिकेसाठी करीनाने 12 कोटी रुपये मागितले का? करीना मौन सोडत म्हणाली…
“‘शेरशाह’ चित्रपट करून चूक केली, असं मला वाटू लागलं आहे”
अरे बापरे! सलमान चक्क घोड्यासोबत खातोय चारा, व्हिडीओ व्हायरल
विद्युत जामवालच्या डेटिंगची सर्वत्र चर्चा, करिश्मासोबत आहे खास कनेक्शन