“अजित पवार पक्षांतर करणार नाही”

मुंबई |  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यावर अजित दादा पक्षांतर करणार नाहीत, असं वक्तव्य भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

मेगाभरतीसाठी अजित पवार यांनी राजीनामा दिला का? असा प्रश्न विचारल्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र त्यांनी मेगाभरतीसाठी राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर शिखर बँक प्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राजीनामा देण्याला विशेष महत्व आहे. 

2014 ला स्थापित झालेल्या सरकारचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. त्याआधीच अजित पवारांनी राजीनामा देण्याला राजकीय महत्व आहे.  

दरम्यान, सिंचन घोटाळ्यात अजित पवारांचं नाव आल्यानंतरही त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्याचाच प्रत्यय आजही आल्याचं पदायला मिळतंय.

महत्वाच्या बातम्या-